बेळगाव लाईव्ह: उद्या रविवारी होणाऱ्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा क्रीडांगणावर करा असा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. त्यामुळे उद्या कर्नाटक राज्यातील सुपर संडे ठरणार आहे.
राज्य युवजन सेवा क्रीडा खात्याच्या सचिवांनी हा आदेश बजावला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा क्रीडांगणावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना मोठ्या पडद्यावर जनतेसाठी आणि खेळाडूंसाठी दाखवण्याची व्यवस्था करावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे बेळगाव नेहरू स्टेडियम वर देखील मोठ्या पडद्यावर खेळाडू आणि जनतेला हा सामना पाहता येणार आहे
या सामन्याचे थेट प्रक्षेपण जास्तीत जास्त लोकांनी पहावे याचीची सोय स्थानिक अधिकाऱ्यांनी करावी असेही आदेशात म्हटले आहे त्यामुळे बेळगाव शहरातील नेहरू स्टेडियम वर मोठ्या पडद्यावर मॅच पाहता येणार आहे.
बेळगावात अनेक हॉटेल्स मॉल इतर ठिकाणी पडदे लाऊन हा ऐतिहासिक सामना दाखवला जाणार आहे आता शासकीय आदेशानुसार देखील मैदानावर अंतिम सामन्याची मजा लुटता येणार आहे.
याअगोदर भारतानेच हा सामना जिंकावा यासाठी अनेक ठिकाणीं पूजा हवन यज्ञ केले आहेत याशिवाय अहमदाबाद मध्ये होणारा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत ऑस्ट्रेलियन पंत प्रधानाना आमंत्रण दिले गेले आहे याशिवाय याठिकाणी आता पर्यंत विश्वकप जिंकलेल्या सर्व कर्णधारांचा सन्मान होणार आहे संगीत आणि इतर रंगारंग कार्यक्रम , खास एअर शो आयोजन देखील अहमदाबाद येथे करण्यात आले आहे याची दृश्ये थेट मॅच दरम्यान पाहता येणार आहेत.
https://x.com/belgaumlive/status/1725891827830554777?s=20