बेळगाव लाईव्ह : बंदी घातलेल्या फटाक्यांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाने छापे टाकून 25 किलो फटाके शनिवारी जप्त केले आहेत.
सरकारने फटाक्यांवर बंदी घालून हरित फटाक्यांना मान्यता दिली आहे. तरीही बाजारपेठेत अजूनही फटाक्यांची विक्री होत असल्याची तक्रार आली होती.
त्यामुळे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या सूचनेनुसार आज संध्याकाळी आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी बाजारपेठेत छापे टाकले. त्यामध्ये 25 किलो फटाके जप्त करण्यात आले.
पर्यावरणाला हानीकारण फटाक्यांची विक्री करण्यात येऊ नये, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या कारवाईत महापालिकेचे आरोग्य निरिक्षक सहभागी झाले होते.