बेळगाव लाईव्ह :एकीकडे बेळगाव भाजप मधील अनेकांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालवले असताना विद्यमान खासदार मंगला अंगडी यांनी निवडणुकी बाबत एक वक्तव्य केले आहे.
उत्तर कर्नाटकातील एकमेव महिला खासदार म्हणून लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळेल, असा विश्वास खासदार मंगला अंगडी यांनी व्यक्त केला आहे.
बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की मी हायकमांडकडेही तिकीट मागितलेले नाही. दिवाळीनंतर मी आमच्या वरिष्ठांकडे तिकीट मागणार आहे. आमचे कार्यकर्ते म्हणतात, तुम्हीच उभे राहा. हायकमांडने तिकीट दिल्यास आपण निवडणूक लढवू आणि ज्याला तिकीट दिले जाईल ते पक्षाचे काम करतील असे त्यांनी सांगितले.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विजयेंद्र यांच्या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, “भाजप नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपद एका सक्षम नेत्याला दिले आहे. विजयेंद्र यांच्याकडे भाजपला मजबूत करण्याची ताकद आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देते.
अशाप्रकारे मंगला अंगडी यांनी भाजपचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना हायकमांडच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. महिला कोट्यासाठी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्याकडे तिकीटांची मागणी करणार असून उत्तर कर्नाटकातील मंगला अंगडी या एकमेव महिला खासदार आहेत.