बेळगाव लाईव्ह :हिंडलगा येथील खराब झालेल्या पंपसेटच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे आज सोमवारी व उद्या मंगळवार दि. 24 ऑक्टोबर रोजी बेळगाव शहराच्या उत्तर व दक्षिण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असून नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन एल अँड टी कंपनीने केले आहे.
हिंडलगा येथील 600 एचपीचा पंपसेट काल रविवारी दुपारी 2:15 वाजता खराब झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात आले आहे. सदर दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन हिंडलगा ते लक्ष्मी टेकडीपर्यंतचा पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत आज व उद्या शहराच्या पुढील भागांमधील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
बेळगाव दक्षिण : प्रभाग क्र. 15, 16, 21, 22, 23, 24, 29, 30, 40 ते44, 49 ते 55, 56, 57, 58 येथील मजगाव, नानावाडी, चिदंबरनगर, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, हिंदवाडी, आरसीनगर पहिला व दुसरा क्रॉस, राजारामनगर, मंगरीसी कॉलनी, महावीरनगर, मॅंगो मिडोज, कलमेश्वर सोसायटी, अनगोळ, टिळकवाडी,
शास्त्रीनगर समर्थनगर, कपलेश्वर कॉलनी, महात्मा फुले रोड आदी भाग. बेळगाव उत्तर : प्रभाग क्र. 1 ते 10 मधील सह्याद्रीनगर, टीव्ही सेंटर, सदाशिवनगर, बसव कॉलनी, कलमेश्वरनगर,
अशोकनगर, माळमारुती, गांधीनगर, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, अहमदनगर, आझाद खान सोसायटी, सुभाषनगर, कॅन्टोन्मेंट हिंडाल्को इंडस्ट्री, केआयडीबी, डिफेन्स एरिया, सैनिकनगर केएलई हॉस्पिटल, बीम्स हॉस्पिटल.