बेळगाव लाईव्ह :राज्यातील महिलांचे आर्थिकसक्षमीकरण करण्यासाठी कुटुंबप्रमुख महिलेला दरमहा दोन हजार रुपये देण्यात येत आहेत. यासाठी राज्य सरकारने गृहलक्ष्मी योजना सुरु केली आहे. मात्र, राज्यातील ९,४४,१५५ महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याची माहिती महिला बाल विकास खात्या कडून मिळाली आहे.
१,५९,३५६ अर्जदारांची डेमो पडताळणी अयशस्वी झाली आहे. लाभार्थ्यांची आधार व बँक खात्यावरील नावे वेगवेगळी असून दुरुस्त ती करण्याचे काम करण्यात येत आहे. ५,९६, २६८ लाभार्थ्यांच्या आधार बँक खात्याशी लिंक केलेले नाही. केवळ २,१७,५३६ लाभार्थ्यांची बँक खाती आधारशी जोडली गेली आहेत, असे त्यांनी सांगितले.
उर्वरित लाभार्थ्यांना आधार कार्ड देण्यासाठी पावले उचलली आहेत. १,७५,६८३ लाभार्थ्यांचे नाव आणि पत्ता वेगळा आहे. विभागाने बँकांमार्फत लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी पावले उचलली आहेत. ९,७६६ लाभार्थ्यांच्या अर्जांची सेवासिंधूकडून पुन्हा तपासणी केली जात आहे.
१.८ कोटी पात्र लाभार्थ्यांना २,१६९ कोटी रुपये अनुदान सरकारने जमा केले आहे. सप्टेंबरमध्ये १.१४ लाख लाभार्थ्यांना २,२८० कोटी रुपये देण्यात आले आहेत. ४ ऑक्टोबरपर्यंत ९३ लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित करण्यात येत आहेत. ५.५ लाख लाभार्थ्यांची माहिती तपासण्यात येत असून त्यानंतर डीबीटीद्वारे पैसे जमा करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.