बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील 18 आमदारात एकही आमदार धनगर समाजाचा नाही यासाठी बेळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा उमेदवारी पैकी एक तिकीट धनगर समाजाला द्यावे का? यावर विचार मंथन सुरू असल्याचे सतीश जारकिहोळी यांनी म्हटले आहे. राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाला याबाबतची माहिती दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बेळगावात आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्या दरम्यान पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नुकताच बिहार सरकारने जातनिहाय जनगणना अहवाल जाहीर केला. त्याचे आम्ही स्वागत करतो. कर्नाटकातही जनगणनेचा अहवाल जाहीर झाल्यास व्हावा असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.
पुढे बोलताना सतीश जारकीहोळी यांनी, आमच्या सरकारकडे जातनिहाय अहवाल तयार आहे. पण, तो जाहीर करण्याबाबत निर्णय झालेला नाही. जात जनगणना अहवालाची अंमलबजावणी चांगली आहे. कोणत्या समाजासाठी कोणता कार्यक्रम करावा. किती अनुदान द्यावे, अशी माहिती आहे. सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी अहवाल चांगला आहे, याबाबत आमच्या सरकारच्या स्तरावर चर्चा सुरू असून सरकारने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे.
जनगणना अहवालासाठी 200 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. आता त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, असे बोलताना सांगितले.
रमेश कत्ती काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र, जो कोणी पक्षात येईल त्याचे स्वागत केले जाईल, असे ते म्हणाले.
धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्याची शिफारस करणे हे राज्य सरकारचे काम आहे. शेवटी त्याची अंमलबजावणी करणे हे केंद्र सरकारचे काम आहे. त्यामुळे सरकारने यावर विचार करून निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.
.