मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 10 आक्टोबर 2023 रोजी दुपारी 3:00 वा.मराठा मंदिर बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. मध्यवर्ती सदस्यांनी वेळेवर हजर रहावे असे अध्यक्ष दीपक दळवी यांनी कळवले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होत आहे त्यामुळे या बैठकीत नेमकी कोणकोणती चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बेळगाव सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेल्या दोन वर्षापासून सुनावणी झाली नाही त्या व्यतिरिक्त विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा झालेला पराभव, 1 नोव्हेंबर काळा दिवस जनजागृती याशिवाय अनेक मुद्दे चर्चेला येतात का ते पहाणे गरजचे आहे.