Wednesday, April 17, 2024

/

पहारेकरी बनले ग्राम पंचायत सदस्य

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ग्राम स्वच्छतेसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत सदस्यांनीच स्वच्छतेसाठी पहारेकरी भूमिका बजावली आहे.

कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत सदस्यांची ग्राम स्वच्छतेच्या बाबतीत प्रशंसा करावी तितकी कमीच! दोनच दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुख्य रस्त्यावरील कचरा रात्री ९.३० च्या दरम्यान पंचायत सदस्यांच्या देखरेखित हटविण्यात आला होता.Gp

या परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आदेश बजावण्यात आला होता की येथे कोणीही कचरा टाकू नये तरी देखील काही लोक तिथे कचरा टाकत आहेत असे समजताच त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य स्वतः विनायक कम्मार,प्रशांत पाटील, वैजनाथ बेन्नाळकर पहारा देत होते.

 belgaum

याच वेळी पॅसेंजर रिक्षा घेऊन एक व्यक्ती तिथे कचरा टाकताना सदस्यांना आढळला तर ग्रामपंचायत सदस्यांनी त्या व्यक्तीला तो कचरा पुन्हा जमा करून घेऊन जाण्यास भाग पाडले.

ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.आणि हेच ग्राम पंचायत सदस्य मार्कंडेय नदी किनारी सुद्धा पहारा देत आहेत.

1 COMMENT

  1. ya lokani bangadya bharalya pahije.phone var dhamaki dili tar yanchi pungi tight. paishya sathi langul chalan karnare pan hech. dam asel tar farfatat anun damba ya dhamaki bajana.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.