बेळगाव लाईव्ह : आयटी अधिकारी सराफा व्यापाऱ्याकडून पैसे घेताना रंगेहाथ सापडल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथे घडली आहे.
निपाणी येथील आयटी अधिकाऱ्याचे असून सदर अधिकाऱ्याने चिकोडी तालुक्यातील अंकली येथील शुराम बंकापूर यांच्या सराफ दुकानाला जाऊन, भीती दाखवत पैश्याची मागणी केली.
तुम्ही मनिलँडरिंग करीत असून, बेकायदेशीर व्यवसाय चालवत आहात असे सांगून कारवाईची भीती दाखवत परशुराम यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली.
तो अधिकारी सराफी कडे रोज वेगवेगळा पता देऊन पैसे आणून देण्याची मागणी करीत होता
सदर बाबत माहिती परशुराम याने बेळगाव मार्केट विभागाचे एसीपी नारायण बरमनी यांना दिली.
त्यानुसार सापळा रचून अंकली येथे टोनपे यांनी सांगितलेल्या ठिकाणी 40 हजार रुपये पाकिटात घेऊन परशुराम उभे होते.
यावेळी पोलिसांनी त्या आय टी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडुन बेळगांव पोलिसांनी पकडुन, बेळगांव एपीएमसी पोलिस स्थानकाला घेऊन आले.
आयटी अधिकारी म्हणजे प्रामाणिक व त्यांच्या नावाने अनेकांना घाम सुटतो. पण अशा आयटी अधिकाऱ्यानेच ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचे काम केले आहे. या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.