Tuesday, January 7, 2025

/

त्या गहाळ फाईलीची चौकशी महापौरांच्या घरावर चिकटवली नोटीस

 belgaum

बेळगाव लाईव्ह: महापालिका कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांच्या तक्रारीवरून महापौर शोभा सोमनाचे यांना मार्केट पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली होती. पण, महापौरांच्या अनुपस्थितीत कुटुंबीयांनी नोटीस घेण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी महापौरांना बेपत्ता ठरवून नोटीस घराच्या दरवाजाला चिकटवली. त्यानंतर संध्याकाळी महापौरांच्या अनुपस्थितीत इतर नगरसेवकांनी पोलिस ठाण्यात उपस्थिती दर्शविली.

महापालिकेत घरपट्टी वाढ करण्याबाबत झालेल्या ठरावाची मूळ फाईल चोरी झाली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कौन्सिल सेक्रेटरी बेटगेरी यांनी शनिवारी (दि. २१) मार्केट पोलिस ठाण्यात महापौर सोमनाचे यांनी फाईल मागून घेतली. ती परत केली नाही, अशी तक्रार केली आहे. या फाईलवरून महापालिकेत राजकारण तापले आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेण्यास नकार देत खातेनिहाय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बुधवारी मार्केट पोलिस महापौर सोमनाचे यांच्या अनगोळमधील घरी नोटीस देण्यासाठी गेले होते. पण, महापौर सोमनाचे घरी नव्हत्या. त्यामुळे, कुटुंबक्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. परिणामी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार महापौरांना बेपत्ता दर्शवून ती नोटीस घराच्या दरवाजाला चिकटवली.

या नोटिसीमध्ये २१ ऑक्टोबर रोजी महापालिका कौन्सिल सेक्रेटरी यांनी तुमच्यावर तक्रार केलीआहे. त्यामुळे, चौकशीचा भाग म्हणून आपण राहावे, असे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर मार्केट पोलिस ठाण्यात चौकशीला उपस्थित सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान महापालिका सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी, आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रवी धोत्रे, जयंत जाधव, नितीन जाधव आदींनी मार्केट पोलिस ठाण्यात उपस्थित राहून पोलिसांच्या चौकशीला सहकार्य केले.

महापौर सोमनाचे यांचा पाय दुखावला असल्यामुळे त्यांना चालता येत नाही. त्यामुळे, त्या स्वतः पोलिस ठाण्यात हजर राहू शकल्या नाहीत. पोलिसांकडे कौन्सिल सेक्रेटरी यांनी केलेल्या तक्रारीची लेखी माहिती द्यावी. त्याला आम्ही उत्तर देऊ, असे सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी पोलिसांना सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.