Tuesday, June 25, 2024

/

फादर एडी फुटबॉल स्पर्धेला दिमाखात प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह:पाॅलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईड आणि सेंटपॉल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 55 व्या फादर एडी आंतरशालेय बाद पद्धतीच्या फुटबॉल स्पर्धेला आज शुक्रवारी सकाळी दिमाखाने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

कॅम्प येथील सेंटपॉल्स हायस्कूल मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या शानदार उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा उपस्थित होत्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेंटपॉल्स हायस्कूलचे प्राचार्य फादर डॉ. सेव्हिओ एम्ब्रू हे होते. यावेळी व्यासपीठावर फादर फर्नांडिस, पाॅलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईडचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू, उपाध्यक्ष परेश मुरकुटे, सेक्रेटरी अनिकेत क्षत्रिय, सुप्रसिद्ध व्यावसायिक नागेश छाब्रिया, संतोष सरोडे, क्रीडा समितीचे चेअरमन अमित पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी सवियो डायस यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले त्यानंतर प्रमुख पाहुण्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या हस्ते आकाशात रंगीबिरंगी फुगे सोडवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांचा उद्घाटनाच्या सामन्यातील प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंची परिचय करून देण्यात आला.

 belgaum

आपल्या उद्घाटन पर भाषणात पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी सेंटपॉल्स हायस्कूलच्या शैक्षणिक, तसेच पाॅलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईड क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या कार्याची प्रशंसा केली त्याचप्रमाणे जीवनातील खेळाचे आणि पर्यायाने शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व विषद केले. खेळामुळे मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहते असे सांगून फुटबॉल खेळाबद्दल बोलताना हा खेळ जगभरातील सर्व देशात खेळला जातो. या खेळामुळे शरीरातील ताकद, वेग आणि धमक वाढते कर्नाटक पोलीस अकॅडमीमध्ये असताना आम्ही फुटबॉल खेळत होतो. कारण त्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांना व्यायाम मिळतो, असे त्यांनी सांगितले.

उपस्थित शालेय फुटबॉलपटू, विद्यार्थी यांना उद्देशून बोलताना प्रत्येकाने खिलाडूवृत्ती जोपासून स्वतःमधील नेतृत्वगुणांचा विकास साधावा. वैयक्तिक कौशल्य वाढवावे. थोडक्यात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास साधावा. यासाठी पालक आणि शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना योग्य मार्ग दाखवावा, असे आवाहनही पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी केले.Father ad football

फादर एडी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत यंदा 20 शालेय संघाने भाग घेतला आहे. यापैकी ‘अ’ गटात सेंट मेरीज, महिला विद्यालय, कणक मेमोरियल, केएलएस, ज्ञान प्रबोधन मंदिर, सर्वोदय खानापूर, भरतेश सेंट्रल, कॅन्टोन्मेंट, केंद्रीय विद्यालय -2 व सेंटपॉल्स तर ‘ब’ गटात लव्हडेल, केएलएस पब्लिक, भरतेश, जैन हेरिटेज, संत मीरा, मराठी विद्यानिकेतन, अंगडी इंटरनॅशनल, फिनिक्स पब्लिक, ज्योती सेंट्रल व सेंट झेवियर्स यांचा समावेश आहे.

आजचा उद्घाटनाचा सामना कनक मेमोरियल स्कूल आणि केएलएस पब्लिक स्कूल यांच्यात खेळविला गेला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास सेंट पॉल्स हायस्कूलसह शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, पालक आणि फुटबॉलप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर स्पर्धा येत्या बुधवार दि. 6 सप्टेंबर 2023 पर्यंत चालणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.