Friday, July 19, 2024

/

‘त्या’ खून प्रकरणाचा लवकरच होणार उलगडा?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील शिवबसवनगर येथील स्पंदन हॉस्पिटलनजीक गेल्या बुधवारी रात्री मोटरसायकल वरून आलेल्या तिघा अज्ञातांनी दगडाने ठेचून केलेल्या खून प्रकरणी एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला असल्याचे समजते. त्यामुळे लवकरच या खुनाचा उलगडा होणार आहे.

नागराज इराप्पा गाडीवड्डर (वय 26, रा. रामनगर वड्डरवाडी) या युवकाच्या गेल्या बुधवारी रात्री झालेल्या निर्घृण हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर माळमारुती पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवण्यास सुरुवात केली असून सदर खून प्रकरणी त्यांच्या हाती एक महत्त्वाचा धागा लागल्याचे कळते.

याच खून प्रकरणाचा vdo cctv मध्ये कैद झाला होता दुचाकीवरून तिघांनी पाठलाग करून दुचाकीवर मध्ये बसलेल्या युवकाने पाठीमागून चालत जात डोक्यात दगडाने हल्ला करत त्याचा भर रस्त्यात खून केला होता अन् पसार झाला होता.Kalimirchi

माळमारुती पोलीस ठाण्याचे सीपीआय कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने अल्पावधीत या खुनाचा छडा लावला असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते.

नागराज गाडीवड्डर याचा खून केल्यानंतर बेळगावातून फरारी होऊन शेजारील महाराष्ट्र राज्यात आश्रय घेतलेल्या हल्लेखोरांना माळ मारुती पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता यासंदर्भात पोलिसांकडून अधिकृत खुलासा होणे बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.