Sunday, December 22, 2024

/

बेळगाव तालुक्यात जिल्हा पंचायत मतदार संघ आहेत.

 belgaum

बेळगाव लाईव्ह:अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कर्नाटक पंचायत राज मतदर संघ निर्णय आयोगाने विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्यातील ३१ जिल्ह्यांतील जिल्हा पंचायत मतदार संघांची संख्या निश्चित केली असून, त्याची यादी प्रकाशित केली आहे. त्यानुसार बेळगाव जिल्हा पंचायतीची मतदार संघ संख्या ८८ वरून ९९ झाली आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या मतदार संघांत कोणकोणत्या गावांचा समावेश असेल, ती यादीही जाहीर करण्यात आली आहे.

आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी बेळगाव तालुक्यात दहा जिल्हा पंचायत मतदार संघ बनवण्यात आले आहेत. बेळगाव तालुक्यातील कोणते गाव कोणत्या मतदार संघात समाविष्ट करण्यात आले जाणून घ्या

• काकती जिल्हा पंचायत: हलभावी, होस वंटमुरी, बोम्मनहट्टी, उक्कड, मल्लहुळ्ळी, परश्यानट्टी, सुतगट्टी, मरणहोळ, रामदुर्ग, भुतरामनहट्टी, होनगा, दासरवाडी,, वीरणभावी, होसूर, जुमनाळ, गौंडवाड, जुने गौंडवाड, काकती,

• कडोली जिल्हा पंचायत मतदार संघ : केदनूर, मणिकेरी, बंबरगे, घुग्रेनहट्टी, कट्टणभावी, गुरमट्टी, निंगेनहट्टी, इदलहोंड, गोडीहाळ, हंदिगनूर, कुरिहाळ (खु.), कुरिहाळ (बु.) चलवेनहट्टी, जाफरवाडी, देवगिरी, गुंजेनहट्टी, अलतगा (खडीमशीन कॉलनी)

●हुदली हुदली, रामापूर, हरणकोळ, धरनट्टी, पडीहोळी, पणगुती, परिहाली अष्टे, बुड्यानूर, चंदगड, कबलापूर, हळ्ळूर, करवीनकोप्प, कारावी, मुचंडी, कलखांब, हुल्यानूर • हिंडलगा : कंग्राळी (बु.), कंग्राळी (खु.) हिंडलगा (विजयनगर ),

बेनकनहळ्ळी, ज्योतीनगर, गणेशपूर. • उचगाव : उचगाव, कोनेवाडी, बसुर्ते, सुळगे (उचगाव), कल्लेहोळ (खडे मशीन कॉलनी), आंबेवाडी, गोजगा, मण्णूर, तुरमुरी, बाची, कुद्रेमानी, बेकिनकेरे अतिवाड

• बेळगुंदी : बेळगुंदी, सोनोली, बोकनूर, सावगाव, मंडोळी, हंगरगा, बिजगर्णी, कावळेवाडी, राकसाकोप्प, यळेबैल बेळवट्टी, बाकनूर, बडस इनाम, धामणे एस. बैलूर, किये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, नावगे, बामनवाडी, जानेवाडी, कर्ले, कुट्टलवाडी, संतिबस्तवाड, वाघवडे, काळेनट्टी, वाघवडे पुनर्वसन केंद्र, मार्कंडेयनगर, रंगदोळी, गुती, नंदी, माविनहोळी, केंचनट्टी.Zilla panchayat belgaum

• येळ्ळूर : येळ्ळूर, अवचारहट्टी, देसूर, झाडशहापूर, राजहंसगड, यरमाळ, सुळगे, धामणे, मासगौनहट्टी, देवगनहट्टी, कुरबरहट्टी, केकेकोप्प, नागेरहोळ, हालगीमर्डी, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी,

• हलगा बस्तवाड : बस्तवाड, कोंडुसकोप्प, खमकारहट्टी, हलगा, मास्तमर्डी, तारिहाळ, कोळीकोप्प, चंदनहोसूर, शगनमट्टी, बसरीकट्टी

• बागेवाडी : अंकलगी, हुलीकवी, बडस के. एच., गजपती, भेंडीगेरी, मुत्नाळ, वीरनकोप्पा, कुकडोळ. अरळीकट्टी, बसापूर, हुलीकट्टी, बागेवाडी, कलारकोप्प, सिद्धनभावी,

• सांबरा : मुतगा, निलजी, शिंदोळी, सांबरा, बाळेकुंद्री के. एच, मावीनकट्टी, बाळेकुंद्री बी.के.

● सुळेभावी : मारिहाळ, मोदगा, होन्याळ, करडीगुद्दी, सुळेभावी, यद्दल भावीकट्टी, खनगाव बीके, चांदूर, खनगाव केएच, तुम्मुरगुद्दी, सोमनट्टी, भीमगड, करकट्टी, सिद्दनहळ्ळी, केंम्पदिनी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.