बेळगाव लाईव्ह: यंदा तब्बल महिनाभर उशिरा हजेरी लावणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात जवळपास पूर्णपणे दडी मारून कहर केला आहे. यंदाच्या 2023 सालातील ऑगस्ट महिना पूर्णतः कोरडा गेला असून बेळगावच्या पावसाळी मोसमाच्या इतिहासातील आजपर्यंतचा हा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना ठरला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी गेल्या 1 जानेवारीपासून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अतिशय कमी पावसाची नोंद झाली आहे. सदर कालावधीत बेळगाव शहरासह तालुक्यात सरासरी 1255.0 मि.मी. इतका सर्वसामान्य पाऊस पडावयास हवा होता. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी 636.7 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
थोडक्यात येथे 618.3 मि.मी. कमी पाऊस झाला आहे. खानापूर तालुक्यातील पावसाच्या प्रमाणातही यावर्षी 747.5 मि.मी. इतकी घट झाली आहे. या तालुक्यात सर्वसामान्यपणे सरासरी 1793.0 मि.मी. पाऊस पडावयास हवा होता. मात्र येथे 1045.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये देखील या पद्धतीने यंदा फार कमी पाऊस नोंदविला गेला आहे. त्यातल्या त्यात रायबाग येथे कमी असला तरी सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी गेल्या 1 जानेवारीपासून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत नोंदविला गेलेला पाऊस (अनुक्रमे पर्जन्यमापन केंद्र, सर्वसामान्य पाऊस, प्रत्यक्षात पडलेला पाऊस आणि कमी /जास्त फरक यानुसार) पुढील प्रमाणे आहे.
अथणी : सर्वसामान्य पाऊस 404.0 मि.मी., प्रत्यक्ष पडलेला पाऊस 228.0 मि.मी., फरक वजा (-)176.0 मि.मी.. बैलहोंगल : 534.0 मि.मी., 414.6 मि.मी. -119.4 मि.मी.. बेळगाव : 1255.0 मि.मी., 636.7 मि.मी., -618.3 मि.मी.. चिक्कोडी : 511.0 मि.मी. 371.8 मि.मी., -139.2 मि.मी.. गोकाक : 403.0 मि.मी., 289.0 मि.मी., -114.0 मि.मी.. हुक्केरी : 588.0 मि.मी., 296.6 मि.मी., -291.4 मि.मी.. कागवाड : 437.8 मि.मी., 214.8 मि.मी., -223.0 मि.मी.. खानापूर : 1793.0 मि.मी., 1045.5 मि.मी., -747.5 मि.मी.. कित्तूर : 893.1 मि.मी., 521.2 मि.मी., -371.0 मि.मी.. मुडलगी : 404.1 मि.मी.,
275.0 मि.मी., -129.1 मि.मी.. निपाणी : 713.4 मि.मी., 459.1 मि.मी., -254.3 मि.मी.. रायबाग : 370.0 मि.मी., 290.8 मि.मी., -79.2 मि.मी.. रामदुर्ग : 409.0 मि.मी., 266.1 मि.मी., -142.9 मि.मी.. सौंदत्ती : 448.0 मि.मी., 299.8 मि.मी., -148.2 मि.मी..