बुडा कार्यक्षेत्रात 28 गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अखेर मंजूर

0
13
Buda
 belgaum

बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) कार्यक्षेत्रात बेळगाव तालुक्यातील 28 गावे समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. बुडा प्रशासनाचा हा निर्णय शासनाकडून अधिसूचित करण्यात आला आहे.

बुडा कार्यक्षेत्रात कार्यक्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या बेळगाव तालुक्यातील गावांमध्ये होनगा, कलखांब, मुचंडी ,अष्टे (अष्टगी), निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री (केएच), बाळेकुंदरी (बीके), होनिहाळ, मावीनकट्टी, बसरीकट्टी, मास्तमर्डी, शिंदोळी, कोंडसकोप्प, धामणे, येळ्ळूर (हट्टी), यरमाळ, कुट्टलवाडी, नावगे, हंगरगा, कल्लेहोळ, सुळगा, गोजगा, मण्णूर, आंबेवाडी (जाफरवाडी), अलतगा व कडोली या गावांचा समावेश आहे.

पुढाकारिक क्षेत्रात पूर्वी बेळगाव शहरासह 25 गावांचा समावेश होता. पुढे 2016 मध्ये त्यामध्ये बस्तवाड व शगनमट्टी या दोन गावांचा समावेश केला गेला. या पद्धतीने तालुक्यातील 27 गावांचा बुडा कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्यामध्ये गोजगा या गावाचा नव्याने समावेश केल्यामुळे 28 गावांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.

 belgaum

या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी बुडा प्रशासन गेल्या 3 वर्षापासून पाठपुरावा करत होते. तथापी तत्कालीन सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नव्हती. मात्र आता राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडून हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

त्यामुळे आता बेळगावचा नवा मास्टरप्लॅन तयार करताना त्यात या 28 गावांचाही समावेश होणार का? याबाबत उत्सुकता आहे बेळगाव तालुक्यातील 28 गावे बुडाकार क्षेत्रात आल्यामुळे तेथील ग्रामपंचायतींचे अधिकार कमी होणार नाहीत. तथापि तेथील गैरप्रकारांना आळा बसणार आहे. लँड युज (भू-वापर) बुडाकडून निश्चित होणार आहे. याखेरीज अनाधिकृत लेआउट किंवा अनधिकृत बांधकामांना आळा बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.