Wednesday, February 5, 2025

/

‘ते’ वृद्ध स्त्री-पुरुष एकाच कुटुंबातील नव्हेत

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहरातील श्री कपिलेश्वर मंदिराच्या जुन्या तलावात आज सकाळी आढळून आलेल्या दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. वेगवेगळी परिस्थिती त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असली तरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघांनीही एकाच दिवशी स्वतंत्रपणे स्वतःला तलावात झोकून देऊन आपले जीवन संपवले.

पत्नीच्या निधनाचे दुःख सहन होत नसल्यामुळे पतीने तलावात उडी घेण्याचा निर्णय घेऊन आपले जीवन संपवले. तर दुसऱ्या हृदयद्रावक प्रकारात आपल्या आईचा मृत्यूमुळे नैराश्य येऊन मानसिक स्थिती बिघडलेल्या मुलीने त्याच तलावात उडी टाकून आत्महत्या केली.

दोघांचे मृतदेह आज सकाळी कपिलेश्वर तलावात आढळले. मंदिरात सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे देवदर्शनास येणाऱ्या भाविकांना तलावात तरंगणारे मृतदेह पाहून अनपेक्षित धक्का बसला. प्रारंभी त्या दोघांनीही एकत्र आत्महत्या केली असावी असे वाटत होते. तथापि पोलिसांच्या प्राथमिक तपासात दोघांच्या मृत्यूस दोन वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.Lake suicide

समजलेली अधिक माहिती अशी की, आईच्या मृत्यूमुळे दाणे गल्ली शहापूर येथील चित्रलेखा सपार हिला नैराश्येने ग्रासून तिची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यातूनच तिने तलावात उडी घेतली. दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराने पत्नीचे निधन झाल्यामुळे कांगले गल्ली, बेळगाव येथील विजय पवार यांचे मानसिक संतुलन ढळले होते.

मंगळवारी रात्री घरातून बाहेर पडलेल्या विजय यांचा निष्प्राण देह आज सकाळी कपिलेश्वर तलावात आढळून आला. विजय पवार यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.