Thursday, May 16, 2024

/

जेंव्हा मनपात राजू सेठ घेतात मराठीची बाजू….

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष :बेळगावात बहुसंख्येने असलेल्या मराठी जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे परंतु भाजपच्या मतलबी राजकारणामुळे अल्पसंख्यांक ठरलेले समितीचे मराठी नगरसेवक एकाकी लढत देत असताना मराठी मतांनी असिफ सेठ यांना दिलेला कौल प्रमाण मानून उत्तर चे राजू सेठ यांनी समितीच्या नगरसेवकांना पाठबळ दिले आणि बैठकीचा नूरच पालटला.भाजप मध्ये मराठी असलेल्या मराठी विरोधी लोकप्रतिनिधी मात्र समिती नगर सेवकांच्या पायात खोडा घालण्याचे इती कर्तव्य इमाने इतबारे पार पाडले या घटनेची दिवसभर बेळगावच्या मराठी जनतेत ठासून चर्चा होत होती.

महापालिकेत मागील बैठकीत मराठीसह तिन्ही भाषेतून नोटीस देण्यात यावी, अशी सूचना सत्ताधारी भाजप नगरसेवक नितीन जाधव यांनी केली होती. तसा ठरावही झाला. पण, प्रत्यक्षात कारवाई झाली नाही. त्यामुळे समिती नगरसेवकांनी आंदोलन केले आणि त्याला काँग्रेसचे आमदार राजू सेठ यांनी पाठींबा दिला. तुम्ही ठराव करूनही कार्यवाही करत नाही, नगरसेवकांना दुय्यम वागणूक का देता, असा जाब त्यांनी सत्ताधारी भाजप आणि प्रशासकीय अधिकार्‍यांना विचारला.

लोकांनी निवडून दिलेले समितीचे नगरसेवक आहेत ते त्यांच्या घरावर नोटीस चिकटवायला ते गुन्हेगार नव्हेत अशी बाजू मांडत राजू सेठ यांनी मराठी च्या बाजूने मनपा सभागृहात जोरदार बॅटिंग केली.

 belgaum

सध्या महापालिकेत म. ए. समितीचे केवळ तीन नगरसेवक आहेत. इतिहासात पहिल्यांदाच अशी नामुष्की ओढवली आहे. पण, या तिन्ही नगरसेवकांनी मराठी कागदपत्रांसाठी आवाज उठवला आहे. पण, मराठीची मागणी करणे म्हणजे राजकारण करण्यात येत आहे, असा आरोप करत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी तिन्ही भाषेतून कागदपत्रे देवून समितीच्या राजकारणावर पडदा टाकण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार ठराव झाला. पण, प्रत्यक्षात त्याची कार्यवाही झालेली नाही. त्याचे पडसाद बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले.

Raju seth Marathi favour

भाषांतरकार नसल्याचे सांगून महापौर शोभा सोमनाचे यांनी मराठीचा मुद्दा टाळला. तर समिती नगरसेवकांचे वर्तन चांगले नाही, असे सांगत भाजपच्या नगरसेवकांनी आणि दक्षिणच्या आमदाराने आक्षेप नोंदवला. कायद्यात मराठीतून कागदपत्रे देण्याची तरतूद नाही, असे अधिकार्‍यांनाही सांगण्यास भाग पाडले. या सर्वामध्ये मराठी कागदपत्रांचा मुद्दा बाजुला सारण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. पण, एकाकी लढत देत असलेल्या समितीच्या नगरसेवकांना आमदार राजू सेठ यांनी साथ दिली.

त्यांनी याआधी कशाच्या आधारावर तिन्ही भाषेतून नोटीस देण्यात होती, असा सवाल उपस्थित केला. ठराव करूनही त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा विषय लावून धरला. यामध्ये दक्षिण आमदार आणि उत्तर आमदारात यांच्यात जुगलबंदी चांगलीच रंगली होती. मराठीच्या बाजुने आमदार सेठ यांनी आवाज उठवल्यामुळे मराठी लोकांत मात्र कौतुक होत आहे.

राजू सेठ यांचे मोठे भाऊ फिरोज सेठ यांनी मनपात दहा वर्षे राजकारण केले मात्र त्या त्यांनी समितीच्या नगरसेवकांच्या बाजूने कधीही आपला कौल दिला नव्हता मात्र त्याला अपवाद ठरत विद्यमान राजू सेठ यांनी मराठीच्या बाजूने सत्ताधारी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यामुळे मनपात केवळ तीन संख्येने कमी असलेल्या समितीच्या मराठी नगरसेवकांना काहीसे बळ प्राप्त झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.