शहरात मंगळसूत्रं लांबविणारे त्रिकूट गजाआड

0
7
Market police station
 belgaum

मध्यवर्ती बस स्थानकासह शहरात विविध ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून लांबविणाऱ्या चेन स्नॅचर त्रिकुटाला मार्केट पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडील 1 लाख 60 हजार रुपये किंमतीची मंगळसूत्रं जप्त केली आहेत.

दस्तगीर लाल साब जमादार (वय 28), संदेश किरण जाधव (वय 25) आणि हनीफ बहासाब यळळूरकर (वय 36, सर्व रा. शिवाजीनगर बेळगाव) अशी पोलिसांनी गजाआड केलेल्या आरोपींची नावे आहेत.

बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाकडून जुन्या भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून लांबवण्यात आल्याची तक्रार गेल्या 11 जुलै 2023 रोजी मार्केट पोलीस ठाण्यात नोंद झाली होती.

 belgaum

याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट उपविभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या नेतृत्वाखाली मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर आणि त्यांच्या पथकाने तपास कार्य हाती घेऊन उपरोक्त तिघाजणांना अटक केली. तसेच त्यांच्याकडील 27 ग्रॅम वजनाची आणि 1 लाख 60 हजार रुपये किमतीची मंगळसूत्रं जप्त केली.

याप्रकरणी कायदेशीर कारवाईसह पुढील तपास जारी आहे. सदर कारवाई बद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी मार्केट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची प्रशंसा करून त्यांना शाबासकी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.