टीचर्स कॉलनी दुसरा क्रॉस येथे तलाव आहे. त्या तलावावर अतिक्रमण करण्यात आले असून त्या ठिकाणी कचरा व माती टाकण्यात आल्याने समस्या निर्माण झाली आहे. सदर तलावात झाडे झुडपे वाढले असून ते तलाव स्वच्छ करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या तलावामध्ये अक्षम्य कचरा साचला आहे. परिणामी अतिक्रमण झाले असून आजूबाजूला झाडे झुडपे ही वाढले आहेत. दरम्यान आजूबाजूला इमारती ही बांधण्यात येत आहेत. त्यामुळे या तलावाचे सुशोभीकरण करण्यात यावे आणि यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मागील अनेक महिन्यांपासून हे तलाव गाळाने भरले आहे. याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे दुर्गंधी पसरली असून रोगराईचा धोकाही वाढला आहे.
तेव्हा महानगरपालिकेने पुढाकार घेऊन याचे सौंदर्यीकरण करावे व मॉर्निंग वॉकर्सना याची सोय करून द्यावी. याचबरोबर या ठिकाणी कचरा उघड्यावर पडत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचबरोबर तलावामध्ये जलपर्णी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
परिणामी स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत गांभीरणी विचार करून या तलावाचा कायापालट करावा, अशी मागणी होत आहे.
टीचर कॉलनी तलावाची जतन होणार का? कचरा टाकण्याच्या प्रकारात वाढ pic.twitter.com/yKENuzgLt9
— Belgaumlive (@belgaumlive) August 9, 2023