Saturday, June 15, 2024

/

पोर्ट एलिझाबेथ मध्ये फडकला बेळगावचा झेंडा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ या शहरात 2 ते 7 ऑगष्ट दरम्यान झालेल्या कॉमनवेल्थ ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये बेळगावची कन्या पूजा प्रकाश शहापूरकर हिने 57 किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवत बेळगावचे नाव उज्वल केले आहे. बेळगावच्या कन्येने मिळवलेल्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.पूजा ही बेळगावच्या डीवायएसएस हॉस्टेल मध्ये सराव करत होती सध्या ती सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत आहे.

ज्युडो कोच त्रिवेणी सिंह आणि जितेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तिने या अगोदर सराव करताना अनेक राष्ट्रीय पदके जिंकली होती. तिने मिळवलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पदकामुळेचे तिची सी आय एस एफ मध्ये निवड झाली होती. सध्या ती सीआयएसएफच्या ज्युडो कोच अनिता दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीत सराव करत आहे. तिचे प्राथमिक आणि हायस्कूल बालिका आदर्श शाळेत झाले असून लिंगराज कॉलेज मध्ये पी यू सी. तर आर सी यू मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तिचे आई वडील शेतकरी असून टिळकवाडी येथे वास्तव्यास आहेत.

आंतरराष्ट्रीय मेडल मिळवण्याचा पूजाचा असा आहे प्रवास ..

 belgaum

पूजा शहापूरकर ही 2010 मध्ये बेळगाव येथील डी. वाय.एस. एस. येथे सराव करत होती. सराव करत असताना सुरुवातीलाच उंच भरारी घेण्याची जिद्द तिने मनी बाळगली होती. 2011 मध्ये झारखंड मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकाविले. 2015 मध्ये केरळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक, हरिद्वार येथे झालेल्या सीनियर नॅशनल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले.Pooja shahapurkar

2015 ते 2018 काळ हा तिच्यासाठी संघर्षपूर्ण होता. तो काळ दुखापतीमध्ये गेला. 2019 मध्ये पुनरागमन करत तिने दुबईत झालेल्या एशियन स्पर्धेमध्ये फक्त सहभाग नोंदवला होता. त्यानंतर खेलो इंडिया साउथ झोन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, महिला लीगमध्ये कांस्यपदक मिळवले.

2016 मध्ये ती सी आय एस एफ मध्ये भरती झाली. 2020 व 2021 कार्यकाळ हा कोरोना काळात गेल्याने कोणत्याही स्पर्धेत सहभाग नाही. त्यानंतर पुन्हा 2023 मध्ये पुन्हा पुनरागमन करत उंच भरारी घेतली आणि आफ्रिकेत तिरंगा फडकवत कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.तिला साऊथ आफ्रिका स्पर्धेसाठी जाण्यासाठी स्वखर्चातून जावं लागलं आहे.
आज मी इथे जे उभी आहे ती केवळ माझ्या गुरुमुळेच. मला गुरु लाभलेले त्रिवेणी एम. एन. आणि जितेंद्र सिंग, अनिता दलाल रोहिणी पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन यांच्यामुळेच मला हे यश मिळाले असल्याची मत तिने आफ्रिकेतून बेळगाव live शी बोलताना व्यक्त केलं.
संकटांचा सामना करत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजी मारण्याचे धैर्य मला माझ्या गुरुजींमुळे मिळाले आहे. वैद्यकीय असो कोरोनाचा काळ असो, संघर्ष हेच जीवनातील योग्य मार्ग दाखविण्याचे गमक आहे असेही तिने आवर्जून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.