Friday, October 18, 2024

/

गृहलक्ष्मी म्हैसुरूला शिफ्ट व्हायचे कारण काय?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना भेटणे सोयीचे जावे यासाठी राज्य सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेचा उद्घाटन समारंभ म्हैसूर येथे आयोजित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

शहरातील काँग्रेस भवन येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. गृहलक्ष्मी योजनेचे उद्घाटन बेळगाव येथे करावे असे यापूर्वी ठरले होते.

मात्र पक्षाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि हाय कमांडच्या निर्णयानुसार आता हा समारंभ म्हैसूर येथे होईल. आगामी कर्नाटक भेटी प्रसंगी काँग्रेस नेते राहुल गांधी विविध ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहे. त्यांची सोय व्हावी या उद्देशाने त्यांच्या प्रवासाच्या मार्गावर म्हणजे म्हैसूर येथे गृहलक्ष्मी योजनेचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.Gruh laxmi

सदर कार्यक्रम संपूर्ण राज्याशी संबंधित असल्यामुळे मीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बेळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे अंतर्गत मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेलेले कांही आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. मात्र ते आमदार कोण आहेत याची माहिती मला नाही. ती माहिती केपीसीसी अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना आहे, असेही त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.