फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर आणि एक्सपर्ट व्हॉल्व अँड इक्विपमेंट प्रा. लि.चे संस्थापक विनायक लोकूर यांनी केएलई हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाची जोखमीची शस्त्रक्रिया सुरू असलेल्या एका रुग्णासाठी तातडीने निर्माण झालेल्या रक्ताच्या गरजेची अवघ्या 23 मिनिटात पूर्तता करून त्याला जीवदान दिल्याची घटना आज घडली. याकामी सोशल मीडियानी प्रसारित केलेल्या वृत्ताची देखील मदत मिळाली आहे.
केएलई हॉस्पिटलमध्ये आज गुरुवारी एका रुग्णावर यकृत प्रत्यारोपणाची जखमीची शस्त्रक्रिया सुरू होती. शस्त्रक्रियेदरम्यान आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊन सदर रुग्णाला तातडीने रक्ताची गरज निर्माण झाली होती.
त्यासंदर्भात रुग्णाच्या नातलगांकडून फोन येताच फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आणि एक्सपर्ट व्हॉल्व अँड इक्विपमेंट प्रा. लि.चे संस्थापक विनायक लोकूर यांनी अवघ्या 23 मिनिटात संबंधित रुग्णासाठी रक्ताची सोय करून दिली.
त्यांच्या रक्तदात्यांमध्ये एसडीपी देणाऱ्या जोगिंदर सिंग यांच्यासह नागेश चौगुले, समीर कुट्रे, मष्णू सनदी, शिखा पाटील व अरुण आनंद गुरुसाली यांचा समावेश होता. आणीबाणीच्या परिस्थितीत सिंगल डोनर प्लेटलेट (एसडीपी) रक्तदाता मिळणे दुर्मिळ असते.
तथापि लोकूर यांचे मित्र असलेल्या जोगिंदर सिंग यांनी आज हातातील महत्त्वाची कामे सोडवून हॉस्पिटलकडे धाव घेऊन त्या रुग्णाचा जीव वाचवण्यास प्रथम प्राधान्य दिले. सर्व रक्तदात्यांची ने -आण करण्याची सोय करण्याबरोबरच एफएफसीने त्या सर्वांचे आभार मानले आहेत.