बेळगाव लाईव्ह : अनैतिक संबंधाच्या संशयातून बेळगाव जिल्ह्यातील अंकलगी पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या अक्कतंगेरहाळ येथे मंगळवारी दोघांचा खून करण्यात आला आहे.
विवाहबाह्य संबंध असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मल्लिकार्जुन जगदरा (वय ४०) आणि रेणुका माळगी (वय ४२) अशी मृतांची नावे असून या प्रकरणी मृत रेणुका माळगीचा पती आरोपी यल्लाप्पा माळगी (वय ४५) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खून झाल्यानंतर रेणुका माळगी हिच्या पतीनेच खून केल्याचे समोर आले असून याप्रकरणी अंकलगी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील व अंकलीचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन पुढील तपास हाती घेतला आहे. मात्र अद्याप या खुनामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.