Monday, April 29, 2024

/

शेतकऱ्याचा मुलगा बनला ज्युनिअर कमांडर ऑफिसर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील गौंडवाड या गावचे सुपुत्र दीपक मल्लाप्पा पाटील यांनी सैन्यदलात घवघवीत यश संपादन केले असून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून वाढलेल्या दीपक पाटील यांनी ज्युनियर कमांडर ऑफिसरपद मिळविले आहे.

लहानपणापासूनच सैन्यदलाची आवड आणि सैन्यदलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या दीपक पाटील यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गौंडवाड येथील सरकारी शाळेत पूर्ण केले.

त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मुतगा येथील महाविद्यालयात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. मराठी माध्यमात शिकलेले दीपक पाटील हे २८ फेब्रुवारी २००२ रोजी उटी येथील मद्रास रेजिमेंट सेंटर येथे भरती झाले होते.Goundwas army

 belgaum

ते सध्या दिल्ली येथील १८ मद्रास युनिटच्या सेंटर मधे सेवा बजावत असून आज २१ वर्षानंतर त्यांना मद्रास रेजिमेंट सेंटरच्या १८ मद्रास युनिटच्या ज्युनियर कमांडर ऑफिस जे.सी.ओ. पदी बढती मिळाली आहे.

मंगळवारी त्यांनी आपल्या नव्या पदाचा पदभार स्वीकारला असून कर्नल रिची अश्विन आणि सुभेदार मेजर मल्लिकार्जुन यांच्या हस्ते त्यांना पदभार सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 belgaum

1 COMMENT

  1. At least check the correct abbreviation before publishing articles. JCO is Junior Commissioned Officer and NOT Junior Commander Officer.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.