भाग्यनगर 10 वा क्रॉस येथे गेल्या चार दिवसापासून रात्रीच्या वेळी दुकानासमोर झोपणाऱ्या एका बेघर इसमाला स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्याने आसरा मिळवून दिला आहे.
भाग्यनगर 10 वा क्रॉस येथे गेल्या चार दिवसापासून रात्रीच्या वेळी रामा चौगुले हा बेघर इसम असहाय्य अवस्थेत एका दुकानासमोर झोपत होता. माणुसकीच्या दृष्टिकोनातून दुकानाचे मालक गितेश पाटील गेले चार दिवस त्या वयस्कर इसमाला झोपण्यासाठी चादर व दोन वेळचे जेवण देत होते.
मात्र कालपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे संबंधितच मला पावसातच पडून रहावे लागत होते. त्यामुळे मन द्रवलेल्या गितेश पाटील यांनी त्वरित महापालिकेचे पर्यवेक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्याकडे मदत मागितली.
तेंव्हा संजय पाटील यांनी लागली गितेश यांची भेट घेऊन त्या वयस्क इसमाची जुनी बेळगाव रोड येथील सेवा केंद्रामध्ये राहण्याची सोय केली. या कामी त्यांना सेवा केंद्राचे प्रमुख रावसाहेब शिरहट्टी यांच्यासह स्थानिक युवक आकाश सचिन व सुमित यांचे सहकार्य लाभले.