पावसाळ्यात भात लावणी करताना सर्प दंश झाल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी बसूर्ते गावात घडली आहे.
लक्ष्मण सोमान्ना घुमठे वय 60 रा. छ्त्रपती शिवाजी महाराज चौक बसुर्ते बेळगाव असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे मुलगी असा परिवार आहे.
या घटनेबाबत समजलेली अधिक माहिती अशी की बुधवारी लक्ष्मण हे शेतात भात लावणी करण्यासाठी गेले होते लावणी करताना दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांना सर्प दंश झाला या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल केले मात्र उपचाराचा काहीही उपयोग झाला नाही त्यांना मृत घोषित करण्यात आले.
लक्ष्मण यांच्या निधनाने घुमठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी वाढू लागली आहे.
पावसाळ्यात शेतकरी कामात गुंतले आहेत अश्या वेळी सर्प दंश झाल्याने शेतकऱ्यांना शासनाने मोठी नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.