Saturday, January 4, 2025

/

जीवित हानीनंतरच हेस्कॉम ‘या’ वीज खांबांकडे लक्ष देणार का?

 belgaum

मुसळधार पावसामुळे अलारवाड क्रॉस येथील रस्त्याशेजारी चार-पाच विजेचे खांब गेल्या तीन चार दिवसापासून पाण्याने भरलेल्या शेतामध्ये कोसळले आहेत.

तक्रार करून देखील दखल न घेणारे हेस्कॉम या ठिकाणी जीवित हानी झाल्यानंतरच दुरुस्तीचे काम हाती घेणार का? असा संतप्त सवाल कृष्णा संताजी या शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांनी केला आहे.

मुसळधार पावसामुळे अलारवाड क्रॉस येथील रस्त्यावरील चार-पाच विजेचे खांब गेल्या चार दिवसापासून लगतच्या पाण्याने भरलेल्या शेतामध्ये कोसळले आहेत.

विजेच्या तारांसकट शेतातील पाणी भरलेल्या गाद्यांमध्ये पडलेल्या या खांबामुळे शेतात कामास येणारे शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकरी कृष्णा संताजी यांनी सांगितले की, गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून आजपर्यंत वारंवार तक्रार करून देखील हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचारी आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे.Hescom negligence

सध्या शेतीच्या कामांचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत कोसळलेल्या विजेच्या खांबांमुळे आम्हाला जीव मोठे धरून काम करावे लागत आहे. गेले चार दिवस झाले अजूनही विजेचे खांब पूर्ववत उभारून दुरुस्ती करण्यात आलेली नाही असे सांगून हेस्कॉमच्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच शेतात कोसळलेल्या विजेच्या खांबामुळे जीवित हानी झाल्यास त्याला कोण जबाबदार? असा सवालही केला.

संताजी यांच्याप्रमाणे अलारवाड क्रॉस येथील अन्य शेतकऱ्यांमध्ये देखील हेस्कॉमच्या बेजबाबदार कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, लोकप्रतिनिधींसह हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन अलारवाड क्रॉस येथील शेतवाडीत कोसळलेल्या धोकादायक विजेच्या खांबांची युद्धपातळीवर दुरुस्ती करून ते पूर्ववत सुरक्षित उभे करावेत आणि शेतकऱ्यांना जीवदान द्यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.