belgaum

मराठी सन्मान यात्रेनिमित्त येळ्ळूर येथे नंदकुमार गोरुले यांची जाहीर सभा

0
476
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने येत्या 27 फेब्रुवारी रोजी “मराठी सन्मान यात्रा” आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा दुपारी 3 वाजता राजहंसगड येथून प्रारंभ होणार आहे.

मराठी सन्मान यात्रा राजहंसगड, सुळगे (ये), येळ्ळूर मार्गे अवचारहट्टी, धामणे असा प्रवास करून पुन्हा त्याच मार्गाने येळ्ळूर गावात फेरी काढणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता येळ्ळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेला शिवसेना नेते स्वर्गीय आनंद दिघे यांचे 12 वर्षे निष्ठेने सहकार्य केलेले शिवसैनिक नंदकुमार गोरुले हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील मूळ रहिवासी असलेले गोरुले हे महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते, दिग्दर्शक, कवी आणि कलाकार म्हणून ओळखले जातात. सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात.

 belgaum

स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अभिनेते प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती नंदकुमार गोरुले यांच्याकडून घेतल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या मुलाखतीत केला होता.

गोरुले यांचे बेळगावजवळील गडहिंग्लजशी असलेले नाते तसेच सीमाभागातील मराठी बांधवांशी असलेला जवळचा संबंध लक्षात घेता त्यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.