Friday, May 3, 2024

/

जैन मुनीची हत्त्या कशासाठी पोलीस अधीक्षक काय म्हणाले?

 belgaum

दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या हिरेकोडी आश्रमाचे आचार्य प. पु. श्री कामकुमार नंदी महाराज यांची आर्थिक व्यवहारातून रायबाग तालुक्यातील कटकभावी गावात हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक झाली असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख (एसपी) संजीव पाटील यांनी दिली.

या खून प्रकरणासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी सदर खून प्रकरणी एकासह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे असल्याचे सांगितले.

पैसे परत मागितल्याने आपण स्वामीजींचा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. सदर खून प्रकरणाचा अधिक तपास केला जात असून वैयक्तिक आर्थिक व्यवहारातून स्वामीजींची हत्या झाली. स्वामीजींनी पैशासाठी तगादा लावल्यामुळे त्यांचा खून करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, स्वामीजी बुधवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार भक्तांनी शुक्रवारी केली होती.

 belgaum

भाविकांच्या तक्रारीच्या आधारे आम्ही तपास केला होता. आम्ही बुधवारसह आदल्या दिवसांच्या घटनाक्रम तपासला. तपासादरम्यान आश्रमात कोण-कोण आले-गेले? याची चौकशी करण्यात आली.Jain muni

स्वामीजींना ओळखणाऱ्या एका व्यक्तीची आम्ही चौकशी केली असता स्वामींना आश्रमात मारून मृतदेह इतरत्र टाकल्याची माहिती त्याने दिली. मात्र त्या माहिती तफावत होती. आरोपींनी प्रारंभी स्वामीजींचा मृतदेह कट्टनभावी येथील एका निरुपयोगी विहिरीत टाकल्याचे सांगितले. त्यानुसार तपास केला असता त्या ठिकाणी मृतदेह आढळला नाही.

त्यानंतर आरोपींनी आपला जबाब बदलताना स्वामीजींच्या मृतदेहाची नदीमध्ये विल्हेवाट लावल्याचे सांगितले. त्यानुसार सध्या मृतदेहाचा शोध घेतला जात असून याप्रकरणी व्यापक तपास मोहीम हाती घेऊन पुरावे गोळा केले जात आहेत, असेही जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी स्पष्ट केले.

आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज गेल्या 15 वर्षांपासून नंदीपर्वत, हिरेकोडी येथील जैन बस्तीमध्ये राहत होते. गेल्या बुधवारी आपण राहत असलेल्या खोलीत पिंची, कमंडल आणि मोबाईल सोडून ते बेपत्ता झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.