Monday, June 17, 2024

/

बापानेच केला मुलाचा खून…

 belgaum

बेळगाव दि १९:बापाने मतिमंद मुलाचा विष पाजून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगा मतिमंद आहे, त्यामुळे धाकट्या मुलाचे लग्न जमणार नाही, या विवंचनेतून बापाने मतिमंद मुलाला विष पाजून संपविले.

एका मुलाचे भवितव्य घडवू पाहणाऱ्या बापाने दुसऱ्या मुलाचा निर्घृणपणे खून करावा, ही अजब घटना खानापूर येथील मलप्रभा नदीकाठावर ३० मे रोजी घडली. या प्रकरणात राजकुमार शंकर मगदूम (वय ४५, रा. बोरगल, ता. हुक्केरी) याला खानापूर पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.निखिल राजकुमार मगदूम (वय २५) असे मयताचे नाव आहे.

३१ मे रोजी शहरापासून जवळच मलप्रभा नदीच्या काठावर एका तरूणाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची शहानिशा काही दिवसात झाली. पण, बाप राजकुमार यांनी त्यांचा मुलगा बेळगावातून बेपत्ता झाल्याचा बनाव केला होता. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. कारण, राजकुमार यानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

 belgaum

तरीही घटनास्थळावर मिळालेल्या स्थितीजन्य पुराव्यांच्या अधारे पोलिसांना खून राजकुमार यानेच केल्याचा संशय आला. त्यादिशेने तपास केल्यानंतर मयताचे काका संतोष मगदूम यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजकुमार यांना अटक करण्यात आली.

राजकुमार यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी खूनाची कबुली दिली. हुक्केरीहून निखिल याला खानापूरला आणले. त्यानंतर त्याला मलप्रभा नदीच्या काठावर निर्जनस्थळी नेऊन त्याला विष पाजले. तो मृत झाला नव्हता, म्हणून त्याचे डोके झाडाला अदळून त्याला ठार केले. त्यानंतर कुणालाही संशय येऊ नये, यासाठी मुलगा हरवल्याचा बनाव करीत स्वत:देखील विष प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, पोलिसांच्या तपासात त्याचे पितळ उघडे पडले.

मतिमंद मुलगा कसेही वागतो. गावात आपली नाचक्की होते. धाकट्या मुलाचे लग्न होणार नाही, या भावनेतून आपण खून केल्याचे राजकुमार यांनी पोलिसांसमोर कबूल केले. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी हिंडलगा कारगृहात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.