पाऊस लांबल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतून काम दिले जावे, अशी शेतकऱ्यांनी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांच्याकडे केली.
रायबाग येथील हरित सेनेच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी जिल्हा पंचायतीला निवेदन दिले.
यंदा पाऊस कमी झाला असून रायबाग तालुक्यातील सवसुद्दी आणि बस्तवाड गावात पावसाअभावी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
चाऱ्याची देखील समस्या निर्माण झाली असून जनावरांसाठी गोशाळेच्या माध्यमातून चाऱ्याची व्यवस्था केली जावी.
तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात रोजगार हमी योजनेतून काम उपलब्ध करून दिले जावे, अशी मागणी करण्यात आली.