Tuesday, May 14, 2024

/

विमा कंपनीला दणका : मयताच्या कुटुंबाला 1.62 कोटी देण्याचा आदेश

 belgaum

ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात ठार झालेल्या दुचाकी वरील व्यक्तीच्या कुटुंबाला विमा कंपनीने नुकसान भरपाई दाखल 1 कोटी 62 लाख 50 हजार रुपये द्यावेत, असा आदेश बेळगावच्या मुख्य उच्च दिवाणी न्यायालयाने दिला आहे.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, गेल्या 25 जानेवारी 2017 रोजी बीटचुंगी -देवप्रयाग (उत्तराखंड) राष्ट्रीय महामार्गावर मोटरसायकल वरून चाललेल्या चंद्रशेखर शिवपुत्रप्पा देशण्णावर (वय 28, रा. तिगडी, ता. बैलहोंगल) आणि प्रवीण नागेश शिगेहोळ्ळी (वय 30 रा. हेब्बाळ, ता. हुक्केरी) यांना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. युए 07 के 8691) धडक दिली.

या अपघातात प्रवीण याला किरकोळ दुखापत झाली असली तरी मोटरसायकलवर त्याच्या मागे बसलेला अभियंता चंद्रशेखर देशण्णावर हा ट्रकचे चाक पायावरून गेल्याने गंभीर जखमी झाला होता. चंद्रशेखर याला उपचारासाठी श्रीनगर दिल्ली डेहराडून येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा फायदा न होता त्याचा मृत्यू झाला.

 belgaum

मोटरसायकलला ठोकणाऱ्या ट्रकचा विमा नव्हता आणि चालकाकडे वाहन चालक परवानाही नव्हता. त्यामुळे ट्रक मालकाकडून नुकसान भरपाई मिळणे अवघड जाणार होते. दरम्यान दुचाकीस्वारांची कांही चूक नव्हती. त्यामुळे दुचाकीवर विमा असलेल्या विमा कंपनीवरच नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करण्यात आला.

न्यायालयात युक्तिवाद मांडताना  वकील सुधीर चव्हाण यांनी  कलम 166 अन्वये मयत झालेल्या चंद्रशेखर यांच्या कुटुंबाला तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मयत चंद्रशेखर यांच्या कुटुंबाला एक कोटी 25 लाख 6 टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला आहे. चंद्रशेखर हा अभियंता होता. त्याला वर्षाला 9 लाख 18 हजार 510 रुपयांचे वेतन मिळत होते. त्यानुसार न्यायालयाने नुकसान भरपाईचा आदेश दिला आहे. फिर्यादीच्यावतीने ॲड. सुधीर चव्हाण,ॲड. एन. आर. लातूर  काम पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.