Saturday, December 7, 2024

/

पाणी पुरवठ्याची व्यवस्था करा -जि. पं. सीईओंची सूचना

 belgaum

मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे पावसाअभावी मलाप्रभा नदी कोरडी पडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या जाव्यात. ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होईल यादृष्टीने व्यवस्था करावी, अशी सूचना जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हर्षल भोयर यांनी केली आहे.

एम. के. हुबळीनजीक मलप्रभा नदी काठावर असलेल्या बहुग्राम पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या केंद्राच्या ठिकाणी काल रविवारी जि. पं. सीईओ हर्षल भोयर यांनी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. कोरड्या पडत चाललेल्या मलप्रभा नदी पात्रात मुबलक पाणी येण्यास अद्याप उशीर आहे. त्यामुळे सध्या कित्तूरसह इतर 13 गाव तसेच हुलीकट्टी आणि इतर 6 गावांमध्ये निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची तीव्रत टंचाईची समस्या अग्रक्रमाने दूर केली जावी अशी सूचना सीईओ भोयर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.

मलप्रभा काठावरील बहुग्राम पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या केंद्राची पाहणी केल्यानंतर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याची समस्या जाणून घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी मलाप्रभा नदीत सध्या शिल्लक असलेल्या पाण्याच्या माध्यमातून अजून 15 दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो अशी माहिती दिली.Bhoyar

आपल्या पाहणी दौऱ्याप्रसंगी सीईओ हर्षल भोयर यांनी पाण्याचा तुटवडा असलेल्या कत्रीदुड्डी आणि कुलहळ्ळी या गावांना भेटी देऊन तेथील पाणी समस्या जाणून घेतली. तसेच गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी बोअरवेल वरील नादुरुस्त मोटारी युद्धपातळीवर दुरुस्त करण्याचा आदेश दिला.

याप्रसंगी चन्नम्मा कित्तूर ता. पं. अधिकारी सुभाष संपगावी, ग्रामीण पेयजल पुरवठा खात्याचे कार्यकारी अभियंता शशिकांत नायक, एइई प्रवीण मठपती, एस. एम. पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष शिंदे, पीडीओ राधा आदींसह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.