belgaum

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगांव आणि कन्नड सांस्कृतीक भवन बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहारदार शास्त्रीय संगीत गीत गायन कार्यक्रम आणि नाट्य महोत्सव शेख होमिओपॅथी महाविद्यालय समोरील कन्नड सांस्कृतिक भवन नेहरूनगर बेळगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

गीत गायन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षा विणा लवकर होत्या. याप्रसंगी केएलई स्कूल ऑफ म्युझिक बेळगावच्या ज्येष्ठ गायिका आणि विचारवंत साहित्यिका प्राचार्य डॉ. दुर्गा नाडकर्णी, गायिका प्रा. डॉ. स्नेहा राजुरीकर, प्रा. डॉ. पंडितराजाराम आंबर्डेकर, प्रा. संगीता बांदेकर, अनिमिष हेगडे, प्रा. योगेश रामदास, सुजाता हुंच्चेनट्टी व स्वाती हुद्धार हे गायक आणि गायिका उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक आरपीडी महाविद्यालयाच्या माजी मराठी विभाग प्रमुख संध्या देशपांडे यांनी केले.

प्रारंभी गायिका प्रा. डॉ. स्नेहा राजुरीकर यांनी संन्यास्य खडग या नाटकातील “मर्म बंधातली ठेव ही प्रेममय ठेवी जपोनी सुखाने दुखवी जीव”, आणि “उगवला चंद” हे गीत गाईले. ज्येष्ठ गायिका आणि विचारवंत साहित्यिका, प्राचार्य डॉ. दुर्गा नाडकर्णी यांनी ययाती नाटकातील “चंद्रिका ही जणू ठेवी या तस्कर मानोनी हे मान अपमान” आणि देवयानी नाटकातील ” यती मन मम मानितल्या एकल्या नृपाला आधी अंत ज्यास नसे त्या सनातनाला” हे गीत गाईले. प्रा. संगीता बांदेकर यांनी गो. ब. देवल लिखित संशय कल्लोळ या नाटकातील हे गीत “मजवरी तयांचे प्रेम खरे पहिले जडली ती उरे कासास लावूनी पाहिले” हे गीत गाईले.

ज्येष्ठ संगीतकार आणि विचारवंत प्रा. डॉ. पंडित राजाराम आंबर्डेकर यांनी “हे सुरांनो चंद्र व्हा चांदण्याचे कोश माझ्या प्रियकरा लागो वाटेत ठरविले माणसांची बरसूनी आभाळ सारे अमृताने” आणि शेवटी भैरवी रागात “कैवल्यांच्या चांदण्याला भुकेला चकोर रे, चंद्रभागा पांडुरंगा मन करा थोर रे, बालपणी खेळी रंगलो तारुण्य नासले, वृद्धपने देवा आता दिसे पैलतीर, जन्म मरण नको आता रे , मरण न घोर नको येरझार” या गीतांचे गायन केले. स्वागत व ईशस्तवन हे गीत कार्यक्रमाच्या प्रारंभी कोरस आवाजात सर्व कलाकारांनी गायीले. संगीतकार अनिमिष हेगडे यांनी “प्रिये पहा ” आणि “रवी मी”, सुजाता हुच्चेनट्टी यांनी “ऋतुराज”, प्रा. योगेश रामदास यांनी “मुरलीधर श्याम” आणि “नभ मेघाने” सौभद्र संगीत नाटकातील हे गीत “वध जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे, मी धरीन चरण त्याचे ” हे गीत गायन केले.Shastriy sangeet

कार्यक्रमात राहुल मंडळोकर यांनी तबल्यावर यादवेंद्र पुजारी यांनी हार्मोनियमवर तर जितेंद्र साबण्णावर आणि भक्ती आंबर्डेकर यांनी ऑर्गन व झांजवादकची साथ यांनी साथ दिली. निवेदन आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र भांडणकर यांनी केले. याप्रसंगी शंकर चौगुले, अनिल चौधरी, गीता कित्तूर, प्रा. निलेश शिंदे, श्रीधर कुलकर्णी, चित्रा यल्लुर, अजित पाटील, कीर्ती टेंबे, शकिरा सय्यद, कुमुद शहाकर, प्रा. ए. एस गोडसे, प्रा. पी. एस. पाटील, वर्षा चव्हाण, विजय पाटील, मानसी भातकांडे, श्रीधर पाटील, आनंद गाडगीळ, विनय जठार, अनिल पाटील, डॉ. संजीवनी खंडागळे, प्रकाश फडणीस, अनिल कागल, प्रा. एस. आर. माडिबोने, शिल्पा बोगरे, विशाल पाटील, विशाल चौगुले, लक्ष्मण बांडगे, शर्मिला प्रभू, सुधीर लोहार, नागराज पाटील, आरती पाटोळे, आसावरी कुलकर्णी, नारायण पाटील, सुमा राव, चित्रा क्षीरसागर, रेश्मा मुचंडीकर, सागर गुंजीकार, प्रज्वल सुतार, आकाश बाडीवाले, गुरूसिध्दय्या हिरेमठ, अंजली चितळे, निखिल भातखांडे, रजनी रायकर, उदय पाटील, प्रकाश खैर, अजित पाटील, मोहन कुलकर्णी, प्रणिता खरात, मेघश्री श्रीशेट्टी , प्रा. मेघा जाधव तसेच संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमातील विविध शास्त्रीय संगीत नाटकातील गीतांचे बहारदार सादरीकरण, अंतकरणाला स्पर्शून जाणारी काळजात जाऊन भिडणारी गीते प्रेक्षकांनी उचलून धरली. हवी तिथे दाद देऊन कलाकारांना प्रोत्साहन दिले. नवनवीन गीतांच्या विविध ढंगात सादर केलेल्या गीतामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.