शांताई विद्या आधार योजना या माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या योजनेअंतर्गत आज एका गरजू विद्यार्थिनीला दिलासा देताना तिला शैक्षणिक शुल्काची मदत करण्यात आले.
माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या शांती विद्या आधार योजनेअंतर्गत आज गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील यांच्यावतीने एका गरजू विद्यार्थिनीला शैक्षणिक शुल्काचे सहाय्य करण्यात आले.
ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शिकण्याची इच्छा आहे, मात्र घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे अडचण येत आहे अशा मुला-मुलींना शिक्षणासाठी सहाय्य करण्याचे कार्य शांताई विद्या आधार गेल्या 9 वर्षांपासून करत आहे.
शांताई विद्या आधार या योजनेचा निधी देणगीदारांच्या सहकार्यासह प्रामुख्याने वृत्तपत्र आणि पुस्तकांच्या रद्दीतून उभा केला जातो हे विशेष होय. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेद्वारे गेल्या 8 वर्षात 50 लाख रुपये किमतीच्या वृत्तपत्र व पुस्तकांच्या रद्दीचा सदुपयोग करण्यात आला आहे. याद्वारे शहरातील 450 हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने सेवाभावी संस्थाना सहाय्य करण्याद्वारे साजरा करत असतात.
त्या अनुषंगाने त्यांनी आज शांताई विद्या आधार योजनेअंतर्गत एका गरजू विद्यार्थिनीच्या शैक्षणिक शुल्कासाठी आवश्यक निधी देणगी दाखल दिला. याप्रसंगी त्या विद्यार्थिनींचे पालक, सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे व इतर उपस्थित होते.