Saturday, July 27, 2024

/

“हिडकल” खाली होण्याच्या मार्गावर; फक्त 2 टीएमसी पाणी शिल्लक

 belgaum

यंदा मान्सून प्रदीर्घ लांबल्यामुळे हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयाची पाणी पातळी अतिशय खालावली असून ते रिकामी होण्याच्या मार्गावर आहे. सध्या 51 टीएमसी क्षमतेच्या या जलाशयामध्ये पावसा अभावी फक्त 2 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे.

गेल्या 10 वर्षाच्या इतिहासात या पद्धतीने पहिल्यांदाच हिडकल जलाशय (डॅम) रिकामी होण्याच्या मार्गावर आहे.

सध्या या जलाशयात शिल्लक असलेल्या 2 टीएमसी पाणी साठ्यामधून बेळगाव शहर, हुक्केरी आणि संकेश्वर गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची कसरत पाणी पुरवठा खात्याला करावी लागत आहे.Water dam

जलाशयातील पाणी साठ्यात चिंताजनक घट झाल्यामुळे सध्या या जलाशयातून कृषी क्षेत्रासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

एकंदर परिस्थिती पाहता जर या आठवड्याभरात पुरेसा समाधानकारक पाऊस झाला नाही तर हिडकल जलाशयातून बेळगाव शहरासह अन्य गावांना होणारा पाणी पुरवठा देखील बंद होणार आहे. रिकाम्या होत असलेल्या या जलाशयाचा तळ सध्या एखाद्या खेळाच्या प्रशस्त मैदानाप्रमाणे भासत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.