बेळगाव लाईव्ह : अनगोळ-वडगाव रोड, पारिजात कॉलनी या परिसरात स्थानिक आमदारांनी केलेल्या अनधिकृत विकासकामांसंदर्भात आवाज उठवत श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला.
अनगोळ-वडगांव रोड, पारिजात कॉलनी येथील जागेचे या भागाच्या स्थानिक आमदारांनी अनधिकृतरित्या रुंदीकरण केले आहे असा आरोप करत सदर प्रकरण सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आले असून याप्रकरणाला एक वर्षाचा कालावधी उलटला आहे.
नव्याने बांधलेल्या गटारी तोंडून २० ते २५ फूट रस्त्याच्या बाजूने गटारी बांधण्याचे काम सुरु आहे. सदर प्रकार रमाकांत कोंडुसकर यांच्या निदर्शनात स्थानिक नागरिकांनी आणून दिला असून याची माहिती मिळताच रमाकांत कोंडुसकर यांनी या भागात तातडीने भेट दिली.
यावेळी तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागात अनधिकृतपणे सुरु असलेले गटारीचे कामकाज बांध करून कंत्राटदार आणि सरकारी अधिकाऱ्यांना जाबही विचारला.