गृहलक्ष्मी योजना ही कर्नाटक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत डीबीटीच्या माध्यमातून राज्यातील बीपीएल, एपीएल व अंत्योदय कार्डधारक कुटुंबप्रमुख महिलेला दरमहा 2000 रुपये सन्मानधन दिले जाणार आहे.
कर्नाटक सरकारकडून 2023 -24 सालासाठी महिला आणि बालकल्याण खात्याच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. गृहलक्ष्मी योजनेबाबत अधिक माहिती पुढील प्रमाणे आहेत. सदर योजनेसाठी उद्या शुक्रवार दि. 16 जून 2023 पासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.
हे अर्ज ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष सेवा सिंधू पोर्टलद्वारे ग्राम वन /बेंगलोर वन /कर्नाटक वन येथे करावयाचे आहेत. (https://sevasindhugs.karnataka.gov.in/gruhalakshmi) अर्जाची पोच पावती सेवा सिंधू पोर्टलच्या माध्यमातून किंवा एसएमएसद्वारे उपलब्ध होईल.
अर्जासोबत अर्जदार महिलेचा आणि तिच्या पतीचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक तसेच बँक खात्याचा तपशील जोडणे आवश्यक असणार आहे. अर्ज मंजूर होताच थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) केले जाईल.
अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागून नाही. अर्ज भरणे मोफत असेल. अर्जदारांनी उपरोक्त केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्रपणे कोणाच्यावर अवलंबून न राहता अर्ज करावेत.