हिंद सोशल जलतरण क्लबच्या दिशा होंडी व आशुतोष बेळगोजी यांची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नुकताच बेंगलोर येथे कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या वतीने बसवनगुडी व हलसुर येथील जलतरण तलावात घेण्यात आलेल्या सबजूनियर जूनियर व सीनियर जलतरण व डायव्हिंग स्पर्धेत बेळगाव आबा स्पोर्ट्स क्लब व हिंद सोशल जलतरण क्लबच्या जलतरण पटुनी उत्कृष्ट कामगिरी करताना एक सुवर्ण एक रौप्य व एक कास्य अशी एकूण तीन पदके मिळविली.
कुमार आशुतोष बेळगोजी याने सीनियर स्टेट लेवल स्पर्धेत 1 मीटर स्प्रिंग बोर्ड डायविंग मध्ये द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक पटकाविले तर कुमारी दिशा होंडी हिने मुलींच्या गट क्रमांक तीन मध्ये पन्नास मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्णपदक तसेच शंभर मीटर फ्रीस्टाइल मध्ये कांस्यपदक पटकावून उत्कृष्ट कामगिरी केली.
कुमार स्मरण मंगळूरकर, वेदा खानोलकर, वरद खानोलकर, श्लोक जाधव, आरोही चित्रगार,यांनी अंतिम फेरीत प्रवेश करून वैयक्तिक कामगिरी उंचावली. कुमारी दिशा होंडी हिने आपल्या गटामध्ये सर्वात जलद जलतरणपटू हा बहुमान पटकाविला तसेच तिची ऑगस्ट महिन्यामध्ये ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य जलतरण संघात अभिनंदनीय निवड झाली आहे.
त्याचबरोबर कुमार आशुतोष बेळगोजी याचे जून 21 ते 25 रोजी बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वरील सर्व जलतरणपटूंना आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे एन आय एस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव,संदीप मोहिते, मारुती घाडी ,शिवराज मोहिते,रणजीत पाटील , किशोर पाटील व सतीश धनुचे यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच हिंद क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी आबा क्लबचे चेअरमन एडवोकेट मोहन सप्रे, अध्यक्ष शितल हुलबत्ते, सेक्रेटरी सौ शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.