Saturday, June 15, 2024

/

काका कलघटगी यांचे निधन*

 belgaum

बेळगाव- समादेवी गल्ली येथील रहिवासी, मार्केटमधील प्रख्यात व्यापारी, वैश्य समाजातील जेष्ठ आणि सारस्वत बँकेचे माजी संचालक रत्नाकर उर्फ काका वामनराव कलघटगी यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले ते 92 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार कर्ते चिरंजीव आणि दोन कन्या,सुना ,जावई,नातंवडे असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा सकाळी दहा वाजता समादेवी गल्ली येथील निवासस्थानापासून निघून सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्मशानभूमी त्यांना श्रद्धांजली वाहणारी सर्वश्री रवी मालशेठ, अनंत लाड ,रणजीत चव्हाण पाटील आणि प्रकाश शिरोळकर यांची भाषणे झालीKaka kalghtgi

 belgaum

एक अतिशय सुह्रदयी व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे
संचालक म्हणून काम करीत असताना त्यांनी बेळगाव येथील अनेक संस्था संघटनांना मदत केली होती.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष विकास कलघटगी यांचे ते वडील होत.रक्षाविसर्जन मंगळवार दि. 6 जून रोजी सकाळी 6 वाजता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.