बेळगाव लाईव्ह : भारतीय सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना शिवशक्ती गुरुकुल विद्यालय असोसिएशनने संधी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या २२ वर्षांपासून भरतीपूर्व प्रशिक्षण देऊन युवकांमधून राष्ट्रसेवक घडविण्याचे कार्य शिवशक्ती गुरुकुल विद्यालय असोसिएशन करीत आहे.
आपणही भारतीय सेनेचा हिस्सा होऊन देशसेवा करावी, असे स्वप्न अनेक युवकांच्या मनात असते, पण ते पूर्ण करण्यासाठी हवी जिद्द, चिकाटी आणि अखंड मेहनत, त्याचबरोबर अचूक मार्गदर्शन. भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दलात युवकांसाठी करिअरच्या अनेक संधी आहेत. भारतीय सेनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना शिस्तबद्ध आणि खडतर प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी शिवशक्ती गुरुकुल विद्यालय असोसिएशन या संस्थेचे नाव घेतले जाते.
वडगाव अनगोळ रोड, भाग्यनगर सातवा क्रॉस, बेळगाव येथे २००२ साली स्थापन झालेल्या या संस्थेने आजपर्यंत ५००० हुन अधिक उमेदवारांना सैन्यदलात यशस्वीरीत्या भरती केले असून आजतागायत ३५ जवान अधिकारी पदावर कार्यरत आहेत. या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या २ जवानांनी सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभाग घेतला असून विविध ठिकाणी ८ जण शहीद झाले आहेत.
या संस्थेत आज शेकडो विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून येथे येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासी प्रशिक्षणाची व्यवस्थाही उपलब्ध आहे. सैनिकी प्रशिक्षणाव्यतिरिक्त नेतृत्वगुण, नैतिक मूल्ये, मानसिक आणि शारीरिक कणखरता बिंबवली जाते. विद्यार्थ्यांच्या निरोगी शरीर आणि प्रसन्न मानसिकतेसाठी क्रीडा आणि साहसी खेळ या बाबींना शिवशक्ती गुरुकुल विद्यालय असोसिएशनने विशेष महत्त्व दिले आहे.
या प्रशिक्षणासाठी दहावीनंतर कोणालाही शिक्षण घेता येऊ शकते. संगणक आधारित परीक्षेसह अनेक बाबींच्या माध्यमातून सैन्यदलासाठी संपूर्ण तयारी शिवशक्ती गुरुकुल विद्यालय असोसिएशनमध्ये करवून घेतली जाते. या असोसिएशनमध्ये अनेक अनुभवी प्रशिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्यात अग्रेसर असून या संस्थेचे प्रमुख डॉ. उमाकांत पाटील यांनी स्वतः जातीने विद्यार्थ्यांवर लक्ष देत उत्तम सैनिक घडविण्यावर आजपर्यंत भर दिली आहे.
या संस्थेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमतेचा विकास, कवायत, नकाशा वाचन, विविध शस्त्रांची माहिती, विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान प्रेरणा मिळावी, या हेतूने लष्करी अधिकाऱ्यांची व्याख्याने वेळोवेळी आयोजित केली जातात. भारतीय सेनेत सामील होऊन अभिमानास्पद करिअर करण्याची ऊर्मी मनात असेल, तर आजच शिवशक्ती गुरुकुल विद्यालय असोसिएशनमध्ये प्रवेश घेऊन आपल्या स्वप्न साकार करा.
अधिक माहिती साठी : डॉ. उमाकांत पाटील, संपर्क क्रमांक ९९१६६०३०३३