Saturday, July 27, 2024

/

सेंट्रल स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम

 belgaum

सेंट्रल हायस्कूल 1988 बॅच वर्गमित्र परिवारातर्फे आयोजित यंदाच्या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ आदित्य कन्स्ट्रक्शन क्लब रोड येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक विश्वजीत हसबे तसेच माजी विद्यार्थी पैकी सचिन ऊसुलकर व संजय हिशोबकर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्रफुल शिरवलकर यांनी प्रास्ताविकामध्ये सेंट्रल हायस्कूल ८८ बॅचच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

यावेळी सेंट्रल हायस्कूल 2022/23 शैक्षणिक वर्षातील दहावीच्या पाच प्रमुख गुणवंत विद्यार्थ्यांचा संजय हिशोबकर, सचिन उसलकर, मुख्याध्यापक हसबे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये ओम सावगावकर, प्रथम रेडेकर, पवन पाटील, ओंकार पाटील आणि प्रथमेश काकती यांचा समावेश होता.

त्याचप्रमाणे यावेळी शहरातील बालमावळाचा विशाल खडकीकर याच्यासह दहावी उत्तीर्ण सानिका गिरीश धामणकर, सृष्टी अभय चौगुले, शर्वरी शशिकांत उंदरे, बारावी उत्तीर्ण प्रथमी विलास मोरे, अभीर प्रफुल शिरवलकर, प्रभू राजे कावळे, डिप्लोमा उत्तीर्ण, स्वरानी प्रफुल शिरवलकर, पदवीधर पूजा विलास लाड, गौरव सतीश गुंडूचे, सिद्धार्थ आदिनाथ सालगुडे आणि हर्षदा शशिकांत उंदरे यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. विश्वजीत हसबे यांनी उपस्थित मुला-मुलींना आणि पालकांना अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले.Central school

या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांना फुले देण्याऐवजी एक पेन व पेढा वाटप करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश धामणेकर व आभार प्रदर्शन प्रफुल्ल शिरवलकर यांनी केले. शेवटी आनंद चौगुले यांच्या ध्येय मंत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद हंगिरकर, संजय हिशोबकर, लक्ष्मीकांत हावळ, राजेश पाटणेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.