बेळगाव लाईव्ह : लडाखच्या लेह जिल्ह्यातील हिमालय पर्वतरांगेतील खरदुंगला पास हि जगातील सर्वाचे उंच मोटरबेल रोड बेळगावच्या सायकलस्वारांनी सर केली आहे.
लेहच्या उत्तर दिशेला लडाख सीमेवर आणि श्योक आणि नुब्रा खोऱ्यांच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या पर्वतीय खिंडीत सुमारे ६०० कि.मी. इतके गिर्यारोहण करून बेळगावच्या वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या सायकलस्वारांनी विशेष कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
हिमालयातील अतिशय निसर्गरम्य असा हा रस्ता जगातील सर्वात खडतर रस्त्यांपैकी एक मानला जातो.
बेळगावच्या साहसी दृढनिश्चयी १४ अल्ट्रा सायकलीस्टनी खरदुंगला पास हा जगातील सर्वात उंचीवरील मोटरेबल रोड अर्थात रस्ता सायकलिंगद्वारे काबीज केला आहे. आपल्या १० दिवसांच्या सायकलिंग मोहिमेद्वारे सुमारे ६०० कि.मी. इतके गिर्यारोहण त्यांनी केले आहे.
मनाली -लेह -खरदुंगला अशा आपल्या सायकल मोहिमेला बेळगावच्या 14 अल्ट्रा सायकलीस्टनी मनाली येथून प्रारंभ केला. त्यानंतर मरही, कीलॉंग, झेड. झेड बार, सरचू, पांग, डीबरिंग, रमस्टे, लेह मार्गे नवव्या दिवशी हे सर्व सायकलपटू खरदुंगला येथे पोहोचले.
हे सर्व सायकलीस्ट वेणूग्राम सायकलिंग क्लब (व्हीसीसी) बेळगावचे सदस्य आहेत. या मोहिमेत अतुल हेरेकर, महेश चौगुले, अनिल गोडसे, भाऊ नेसरकर, बाळकृष्ण गोडसे, प्रसाद चंदगडकर, अनिल गोडसे, धीरज भाते, सचिन अष्टेकर, राहुल ओऊळकर, विक्रांत कलखांबकर, राजू नायक, अजित शेरेगार, महेश जुवळी आणि जसमिंदर खुराना या साकलस्वारांचा समावेश आहे.
त्यांच्या या यशाबद्दल या सर्वांचे सायकलिंग क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.