belgaum

कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री व राज्यातील सर्व जिल्ह्यातील चेंबर ऑफ कॉमर्स शाखांच्या वतीने आगामी 22जून रोजी एकदिवसीय कर्नाटक बंद ची हाक देण्यात आली आहे.

हेस्काम वीज पुरवठा महा मंडळाकडून वीज शुल्कात असामान्य दरवाढ केल्याच्या निषेधार्थ सर्व व्यापाऱ्यांनी आणि उद्योगधद्यांनी एक दिवस आपले व्यवहार बंद ठेवावेत अशी विनंती करण्यात आली आहे.

गेल्या 8 दिवसांपासून आम्ही वीज दरवाढीमुळे होणाऱ्या परिणामांचे गांभीर्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अधिकारी किंवा सरकारी प्रतिनिधींकडून कोणताही तोडगा निघत नाही.

याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही या बंदची हाक देत आहोत. त्यावर उपाय शोधून वीज शुल्कात कपात करण्याची आमची इच्छा आहे. त्यांना आशा आहे की सरकार आमच्या विनंतीला प्रतिसाद देईल असे राज्य चेंबर ऑफ कॉमर्सने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजसह एफओएबीने यापूर्वीच वीज दरवाढीला विरोध केला आहे. गदग, विजापूर, राणेबेन्नूर, रायचूर, तालिकोटी, विजयनगर, म्हैसूर, दावणगेरे, कोप्पल, बागलकोटी, धारवाड, सिरसी, कारवार, बिदर, शिवमोगा, कोलार, मंड्या, चिकमंगलोर, यादगीर, चित्रदुर्गा, हसननगर, बेलनाटका, हावेरी या जिल्हा चेंबर्स , बेळगावमधील व इतर उद्योग संघटनांनी आंदोलनात सहभागी होण्याचे मान्य केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.