पाणी पुरवठा तलावांचे पुनरुज्जीवन करत अनेकांची तहान भागवणाऱ्या प्यास फाउंडेशनने आग लागलेल्या मोठ्या वडाच्या वृक्षाला जीवनदान दिले आहे.
शनिवारी रात्री 10:25 वाजताच्या सुमारास
क्लब रोडवर एका जुनाट वटवृक्षाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या साहाय्याने झाडाला लागलेली आग विझवत जीवनदान दिले आहे.
क्लब रोड वर अनेक मोठमोठे वडाचे पिंपळाचे वृक्ष आहेत आग लागलेले झाड आदल्या दिवशी सकाळपासून जळत होते आणि स्थानिकांच्या प्रयत्नानंतरही आग वाढतच होती प्यास फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून जिल्हा अग्निशमन अधिकारी शशिधर यांच्या नेतृत्वाखाली कुशल अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यांना आग विझवण्यात यश आले.
वट वृक्षाला जीवनदान देण्यात परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जलद आणि निर्णायक कारवाई केल्याबद्दल प्यास फाउंडेशन त्यांचे विशेष आभार मानले आहे.
काही समाजकंटकाकडून झाडांना आग लावून झाडे तोडण्याचे प्रकार होत आहेत. या प्रकारात झाडाच्या बेचक्यात किंवा झाडाच्या बुंध्यात विस्तव टाकून झाडे पेटवली जातात या प्रकाराला नागरिक व प्रशासनाने चाप लावला पाहिजे.
कोरोनाच्या काळात जगभरातील नागरिकांनी ऑक्सिजनचे महत्त्व चांगलेच ओळखले आहे. ऑक्सीजन विना टाचा घासून अनेक लोकांनी प्राण सोडलेले होते. लाखो रुपये खर्च करून देखील अनेकांना ऑक्सिजन मिळाला नव्हता. आपल्या देशातील वटवृक्ष मानले जाणारे जे जुनाट आणि मोठे वृक्ष आहेत ही ऑक्सिजनची भंडारे आहेत यांना टिकवणे जगवने ही काळाची गरज आहे. निसर्गाने दिलेला हा मोफतचा अनमोल ठेवा आम्ही जपायला हवा. बेळगावात स्मार्ट सिटीची कामे झाल्याने मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण झाले आहे त्यामुळे शहरात तील गर्मी वाढली आहे याशिवाय व्हॅक्सिन डेपो सारख्या मानल्या जाणाऱ्या ठिकाणची झाडांची कत्तल झाली आहे अशा परिस्थितीत बेळगाव चे तापमान जर नियंत्रण ठेवायचे असेल तर झाडांचे संवर्धन संगोपन आणि नवीन झाडांची लागवड करणे हा ही काळाची गरज बनली आहे.