भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांच्या प्रती आदरभाव ठेवण ही परंपरा आहे. आपल्या कुटुंब व्यवस्थेत बाप हा कुटुंबाचा कणा मानला जातो. देशाच्या सामाजिक व्यवस्थेत अधिकाधिक ठिकाणी बाप हाच कुटुंब प्रमुख असतो. साहित्यातही बापाच्या फाटलेल्या बनियनची कथा, त्याच्या दाडीच्या खुटात ओघळलेल्या अश्रुंच्या व्यथा आणि प्रतिकूल परिस्थितीला दिलेल्या झुंजीच्या शौर्य कथायाची दणकट मांडणी केलेली असते. हे सगळ पहाता संस्कृती टिकवण्यासाठी कुटुंब व्यवस्था किती महत्वाची हे अधोरेखित होत जाते ,म्हणून आजचा फादर्सडे विशेष उल्लेखनीय आहे.
अनेकजण फादर्स डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करत असतात. कुणी समाजसेवा करून, कुणाला मदत करून तर कुणी सोशल मीडियावर स्टेटस रील बनवून तर कुणी आपापल्या पद्धतीनं फादर्स डे साजरा करत आपल्या वडिलांना आदर देत असतात. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ऋत्वी गजानन जैनोजी यांचा फादर्स डे संस्कृतीला सक्षमीकरनाकडे नेणारा आहे.
शिवराज्यभिषेक दिना निमित्त गजानन जैनोजी यांनी आपली कन्या रुत्वि हिला राजहंसगड किल्ल्यावर नेऊन शिवरायांना अभिषेक घालून नतमस्तक व्हायला लावले गेल्या दोन वर्षापासून शिवरायांना गडावर अभिषेक घालण्याचा vdo सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय बेळगाव live च्या माध्यमातून लाखो लोकांनी हा vdo पाहिलाय राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे देखील त्या vdo ने प्रभावित होऊन आपल्या अकाऊंट वरून त्यांनी शेअर केलाय अन खुद vdo कॉल करत तिच्याशी संवाद देखील साधला होता.
मुलांच्यावर कसे संस्कार करावेत याचेही काही आदर्श आहेत, जसे पेरावे तसे उगवते,संस्कृती पेरली तर सुदृढ समाज व्यवस्था निर्माण होते या पार्श्वूभूमीवर बेळगाव तालुक्यातील मच्छे येथील गजानन जेनोजी यांची चिमुकली कन्या रुत्वी जैनोजी हिच्या पुढे जैनोजी कुटुंबीयांनी ठेवला आदर्श तो शौर्य, पराक्रम, संयम याचे मूर्तिमंत उदाहरण छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा…संस्कारक्षम वयात रूत्वीने पकडला हा इतिहासाचा रेशमी धागा !!आपल्या बोबड्या बोलाने अवघ्या दीड वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या ऋत्विने बाप कसा असावा याचा आदर्श कोवळ्या वयातच घेतला. लाखाचा पोशिंदा छ्त्रपती राजा काळाच्या ओघात बनला अवघ्या रयतेचा बाप…
ही बापाची विशाल कल्पना जेंव्हा मच्छे येथील युवा कार्यकर्ते गजानन जैनोजी यांना समजली तेंव्हा त्यांनी आपल्या कन्येच्या मेंदूत ही संकल्पना रुजवली आणि तिच्या अवघ्या आयुष्याचं सोने केलं. ज्या समाजाकडे आदर्शासाठी बाप नावाच्या संकल्पनेचे एवढं विशाल व्यक्तिमत्व आहे त्या समाजाला संस्कारक्षम होण्यासाठी दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची आवश्यकता नाही.
म्हणतात…शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा बोलणे कैसे चालणे, तद्वत वडिलांनी आपल्या पुढील पिढीला फादर्स डे च्या दिवशी हा जगाचा बाप समजावून सांगावा आणि उदंड करावे आपल्या लेकरांचे आयुष्य!!! त्यावेळी घडेल एक संस्कारक्षम स्वाभिमानी पिढी,हीच आजच्या फादर्स डेच्या निमित्ताने अपेक्षा, रूत्वी जैनोजी बनू पहाते या एका बीजाचे गोमटे रूप तिलाही टीम बेळगाव live कडून हार्दिक शुभेच्छा…