29 C
Belgaum
Sunday, December 3, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 29, 2023

तहसीलदार मण्णीकेरी यांचा मृत्यू संशयास्पद?

बेळगाव लाईव्ह : बेळगाव प्रांताधिकारी कार्यालयाचे तहसीलदार अशोक मण्णीकेरी यांचा मृत्यू वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. बेळगावच्या प्रांताधिकारी कार्यालयाचे तहसीलदार अशोक मण्णीकेरी यांचे बुधवारी (दि. २८ जून) मध्यरात्री निधन झाले. त्यानंतर...

“व्हीसीसी”च्या सायकलपटूंची हिमालयातील साहसी मोहीम

बेळगाव लाईव्ह : लडाखच्या लेह जिल्ह्यातील हिमालय पर्वतरांगेतील खरदुंगला पास हि जगातील सर्वाचे उंच मोटरबेल रोड बेळगावच्या सायकलस्वारांनी सर केली आहे. लेहच्या उत्तर दिशेला लडाख सीमेवर आणि श्योक आणि नुब्रा खोऱ्यांच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या पर्वतीय खिंडीत सुमारे ६०० कि.मी. इतके गिर्यारोहण...

महिलांसाठी शेअर मार्केटमध्ये करिअरची संधी

बेळगाव लाईव्ह : महिलांनी अनेक क्षेत्रात जरी प्रगती केली तरी अद्याप बहुतांशी मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला व्यवसाय हे आपले क्षेत्रच नसल्याचे ठाम मत बनवून आहेत. घरकाम करणाऱ्या, घर सांभाळणाऱ्या, नोकरी करणाऱ्या यासारख्या अनेक क्षेत्रात आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या महिलांसाठी शेअर...

राकसकोप कोरडा! गाळ काढण्याची संधी मनपाने हुकली!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत यंदा जून महिन्यात कमालीची घट झाली आहे. वळिवाची गैरहजेरी आणि लांबणीवर पडलेल्या मान्सूनमुळे राकसकोप जलाशय जून महिन्याच्या अखेरीस कोरडा पडला आहे. २८ जून उजाडला तरी पावसाने म्हणावी तशी हजेरी...

पावसाअभावी भाजीपाल्यांचा दर गगनाला

मान्सूनच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा दुष्परिणाम कृषी क्षेत्रावर झाला असून जिल्ह्यातील भाजीपाला पिकांचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाजारपेठेमध्ये सध्या भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. पावसाअभावी उत्पादन घटल्यामुळे सध्या बाजारपेठेत भाज्या आणि फळांचा तुटवडा निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. भाजीपाल्याच्या मागणीसह दरात...

“हिडकल” खाली होण्याच्या मार्गावर; फक्त 2 टीएमसी पाणी शिल्लक

यंदा मान्सून प्रदीर्घ लांबल्यामुळे हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयाची पाणी पातळी अतिशय खालावली असून ते रिकामी होण्याच्या मार्गावर आहे. सध्या 51 टीएमसी क्षमतेच्या या जलाशयामध्ये पावसा अभावी फक्त 2 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या 10 वर्षाच्या इतिहासात या पद्धतीने पहिल्यांदाच...

शांताई विद्या आधार अंतर्गत गरजू विद्यार्थिनीला मदत

शांताई विद्या आधार योजना या माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या योजनेअंतर्गत आज एका गरजू विद्यार्थिनीला दिलासा देताना तिला शैक्षणिक शुल्काची मदत करण्यात आले. माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या शांती विद्या...

जनावरे पकडण्याची मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरूच

बेळगाव महानगरपालिकेकडून शहरात रहदारीला अडथळा ठरणार्‍या मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली असून आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी ही मोहीम सुरूच होती. महापालिकेच्या पथकाने आज गुरुवारी खडेबाजार येथून तीन मोकाट जनावरे पडकली. शहरात वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या मोकाट जनावरांना पकडण्याबाबत...

शहर परिसरात आषाढी एकादशी भक्तीभावात

बेळगाव शहर परिसरात आज गुरुवारी आषाढी एकादशी भक्तीभावाने साजरी करण्यात येत असून ठीक ठिकाणच्या श्री विठ्ठल मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची एकच गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे. आषाढी एकादशी निमित्त खडेबाजार बेळगाव येथील पुरातन श्री विठ्ठल मंदिरामध्ये आज पहाटे अभिषेक आणि...
- Advertisement -

Latest News

जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !