Thursday, May 2, 2024

/

स्मार्ट कार्डच्या रूपात मिळणार बसपास

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जूनच्या पहिल्या आठवड्यात बसपास ऑनलाईन प्रक्रियेची तारीख जाहीर केली जाणार असून, यंदा विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्डच्या स्वरूपात बसपास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासंदर्भात आवश्यक ती माहिती पुढील आठवड्यात जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती परिवहन अधिकारी के. के. लमाणी यांनी दिली आहे.

यंदा विद्यार्थ्यांना बसपास मिळविण्यासाठी रांग लावावी लागणार नसून सेवासिंधू अँपवर ऑनलाइन अर्ज दाखल केल्यावर गावातील ग्रामवन किंवा कर्नाटक वन केंद्रातून पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात बसपास ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ केला जाईल.

शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ झाला असून १ जून पासून पास वितरण प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, परिवहन मंडळाने स्मार्ट कार्डच्या धर्तीवर नवे पीव्हीसी बसपास ऑनलाईनच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने बसपास वितरण प्रक्रिया थोडी लांबणार आहे. यंदाची पास वितरण प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय परिवहन मंडळाने घेतला असून विद्यार्थ्यांना पुढील काही दिवस तिकीट काढूनच परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करावा लागेल.

 belgaum

बसपास मिळविण्यासाठी यापूर्वी प्रथम सीईसी केंद्रात जाऊन सेवासिंधू संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागत होता. तेथे ऑनलाईन अर्ज केल्याची प्रिंटेड पोच घेतल्यानंतर बसपासचे निर्धारित शुल्क आणि पोचपावती शाळेत जमा करावी लागत होती. एकत्रित अर्ज घेऊन शाळेचे प्रतिनिधी परिवहन मंडळाच्या पास काउंटरवर जमा करत होते. या ठिकाणी बसपास तयार करून ते पुन्हा शाळेत पाठविले जात.

आणि या सर्व प्रक्रियेनंतर शाळेतून विद्यार्थ्यांना पास दिले जात होते. या प्रक्रियेत अधिक वेळ खर्ची जात होता शिवाय शाळेतून वेळेत बसचे अर्ज परिवहन मंडळाकडे जात नसल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळण्यात अडचणी येत होत्या.

यंदा प्रथमच सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार बसपास मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.