Saturday, May 18, 2024

/

युवकांसाठी प्रेरणास्थान : आर. एम. चौगुले

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील मण्णूर या गावातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजेच आर. एम. चौगुले. बालपणापासूनच अत्यंत काटकसरी स्वभाव, अभियंता व्हायचा संकल्प मनाशी बाळगून कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात आर. एम. चौगुले यांनी यश मिळविले आहे.

कष्ट आणि मेहनतीची सांगड त्याचबरोबर कुटुंबाशी एकरूप समाजाशीही नाते जोडण्यात आर. एम. चौगुले याना यश मिळाले आहे. आजवर त्यांनी असंख्य माणसांना जोडून मोठा जनसंपर्क वाढविला आहे. ग्रामीण भागात अनेक तरुणांच्या सोबतीने युवावर्गाचे नेतृत्व म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेले आर. एम. चौगुले हे शेतातील कामेही तितक्याच आवडीने करतात. परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी शिक्षणालाही आपलंस केलं. इतर सर्व गोष्टी सावरताना त्यांनी शिक्षणाला बगल दिली नाही.

 belgaum

मण्णूर सरकारी मराठी शाळेत प्राथमिक, हिंडलगा हायस्कुलमध्ये माध्यमिक, आर. एन. शेट्टी महाविद्यालयात सिव्हिल डिप्लोमा अशा पद्धतीने त्यांनी आपल्या शिक्षणाची वाट पूर्ण केली. वेळप्रसंगी रंगकाम, गवंडी काम यासारखी कामं करून आपलं इंजिनीयरिंगचं शिक्षणही जिद्दीने पूर्ण केलं. आपल्या क्षेत्रात इतरांनाही संधी मिळावी यासाठी रिकाम्या हातांना कामं देण्यासाठी आर. एम. चौगुले असोसिएट बिल्डर अँड डेव्हलपर्स नावाची फर्म सुरु केली. त्यानंतर याच फर्मचं रूपांतर त्यांनी वननेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीत केलं. तालुक्यातील सुतार, बांधकाम कामगार, वीट, वाळू व्यवसायिक, फॅब्रीकेटर्स, इलेक्ट्रिकल कामगार, प्लंबर, पेन्टर अशा शेकडो कामगारांना कामं दिलं. आज आर. एम. चौगुले यांच्या नावाची गणना बेळगावमधील नामांकित बांधकाम इंजिनियर्समध्ये केली जाते.Rm chougule

आपले क्षेत्र वगळता त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात भरारी मारली. अडचणीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरण्यासाठी, आजारी व्यक्तींना अर्थसहाय्य, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवकांना सतत सहकार्य, राजकीय क्षेत्रात विविध आंदोलनात सक्रिय सहभाग अशा पद्धतीने त्यांची वाटचाल सुरु आहे. सध्या आर. एम. चौगुले हे राजकारणात अधिक सक्रिय आहेत. माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बळकटीकरणासाठी तालुक्यात विविध ठिकाणी सक्रियपणे ते कार्यरत आहेत.

आर. एम. चौगुले यांनी सहकार क्षेत्रातही सक्रिय सहभाग दर्शविला आहे. जोतिर्लिंग मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमनपद भूषविले आहे. याचप्रमाणे मार्कंडेय संस्थेच्या संचालकपदी देखील ते कार्यरत आहेत. बेळगाव, खानापूर, बैलहोंगल, धारवाड, हुबळी, कोप्पळ, बेळ्ळारी अशा विविध भागात व्यापारी, रहिवासी संकुल आणि सरकारी कार्यालये बांधून नावलौकिक मिळविला आहे.

विद्यार्थ्यांसाठी कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठान अंतर्गत विविध शिबिरांचे आयोजन, मार्गदर्शनपर उपक्रम, व्याख्यानमाला, विविध स्पर्धा परीक्षांचेही त्यांनी आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. संयम जिद्द आणि प्रामाणिकपणा अखंडपणे सोबतीला घेऊन वाटचाल करणाऱ्या सिमाभागातील युवानेत्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

प्रा. सौ. छाया (मोरे) पाटील, राकसकोप-बेळगाव

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.