विधानसभा निवडणुकीसाठी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने निवड प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. रविवारी मराठा मंदिरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील दक्षिण आणि उत्तर मतदार संघासाठी 4 ते 6 एप्रिल असे तीन दिवस इच्छुक उमेदवारा कडून अर्ज मागवले जाणार आहेत यासाठी इच्छुकांनी सकाळी 10 ते सायंकाळी सहाच्या वेळेत दीड लाख रुपये अनामत रक्कम आणि पन्नास हजार रुपये देणगी सह अर्ज मागवले आहेत.
शहरातील दक्षिण मतदार संघाचा उमेदवार निवडण्यासाठी बारा सदस्यांची कमिटी बनवण्यात आली असून सदर कमिटी दक्षिण भागातील गल्ली गावातील निवड समितीच्या सदस्यांची यादी बनवणार आहे सदर निवड कमिटी च्या माध्यमातून उमेदवार निवडला जाणार आहे.
बेळगाव उत्तर मतदार संघासाठी दत्ता जाधव, रायमन वाझ यांच्या नेतृत्वाखाली कमिटी बनवून उमेदवार निवडण्याचे ठरवण्यात आले आहे. रविवारच्या बैठकीसाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरम्यान मराठा मंदिरात झालेल्या बैठकीत सदर निवड कमिटीची सूची एका उमेदवारांच्या एका गटाला पूरक होईल अशी बनवण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे.
शहर समितीच्या ‘त्या’ जबाबदार पदाधिकाऱ्यांने डमी उमेदवार देण्याच्या हालचालीतून निवड समितीची सूची, अगोदरच ठरवून आणलेली खिशातून काढून बैठकीत वाचवून दाखवली, त्यामुळे ती लोकशाही पद्धतीतून निवडली गेली नाही आणि सर्व समावेशक नाही, असा आरोप केला जात आहे. दरम्यान उद्या सदर निवड कमिटीची सूची बदलण्याचे संकेत मिळाले आहेत.